Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील सत्तासंघर्ष पुन्हा सर्वोच्च न्यायालयात

शिवसेना पक्ष व धनुष्यबाणासाठी 31 जुलैला सुनावणी

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला असून, आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी

शासकिय योजनांची माहीती जनसामान्यपर्यंत पोहचवा सचिव भाऊ चौधरी
“अपने 2′ ला संगीत देणार हिमेश रेशमिया l पहा LokNews24
अल्पवयीन पत्नीशी शरीरसंबंध बलात्कारच

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला असून, आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच दिला असला तरी, ठाकरे गटाने पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा आणि, पक्षाचे नाव शिवसेना अणि चिन्ह धनुष्यबाण आमचे असून ते आम्हालाच मिळायला हवे, यासाठी ठाकरे गटाने याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात येत्या 31 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्यामुळे राज्यातील सत्ता-संघर्ष पुन्हा एकदा कोणत्या गटाकडे जातो पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. एकीकडे अजित पवारांनी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षावर दावा केला असून, त्यांनी निवडणूक आयोगामध्ये याचिका दाखल केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचा निर्णय देखील निवडणूक आयोगाला घ्यावा लागणार आहे. मात्र शिवसेनेसंदर्भात घेतलेला निर्णय न्यायालय योग्य ठरवते की, ठाकरे गटाला पुन्हा शिवसेना आणि धनुष्यबाण देते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. त्यांची याचिका येत्या 31 तारखेला सूचीबद्ध करू, असे कोर्टाने म्हटले आहे. एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकारी आमदारांनी गतवर्षी शिवसेनेशी बंडखोरी केली होती. कालांतराने त्यांच्या गटाला निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव व निवडूक चिन्हही दिले होते. आयोगाच्या या निर्णयाला ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यात त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांचा अपात्रतेचा निर्णय निकाली निघेपर्यंत आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. तसेच पक्षातील बहुतांश सदस्य आमच्या बाजूने असूनही आयोगाने शिंदेंना नाव व पक्षचिन्ह बहाल करण्याचा निर्णय चुकीचा होता, असा दावाही त्यांनी या याचिकेद्वारे केला आहे. त्यांच्या या याचिकेवर येत्या 31 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे वादाला नव्याने फोडणी मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40 आमदारांना घेत मविआ सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमचीच आहे असा दावा केला. त्यावर उद्धव ठाकरेंनी हरकत घेतली. दोन्ही नेत्यांकडून शिवसेनेसह धनुष्यबाणावर दावा करण्यात आल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे सोपवले. त्यावर आयोगाने शिवसेना हे नाव व धनुष्यबान हे पक्षचिन्ह शिंदेंना देण्याचा निर्णय दिला.

शिवसेनेचे ’ते’ 16 आमदार अपात्र ठरतील ः झिरवळ – सर्व बाजूने विचार केला तर शिवसेनेचे ते 16 आमदार अपात्र ठरतील असे मोठे विधान विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी केले आहे. अपात्रतेची निर्णय प्रक्रिया सुरू झाल्यावर नरहरी झिरवळ यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणावर व्यवस्थित अभ्यास करून निर्णय दिला जाईल असे सांगितंल होते. त्यानंतर आता या आमदारांच्या अपात्रतेची निर्णय प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. सर्व बाजूने विचार केला तर शिवसेनेचे ते 16 आमदार अपात्र आहेत, पण हा निर्णय शेवटी अध्यक्षांकडे असेल, त्यांच्याकडे शेवटचे अधिकार आहेत. त्यामुळे मी त्याच्यावर वक्तव्य करणे उचीत ठरणार नाही असे विधान त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

COMMENTS