म्हसवड / वार्ताहर : मलेशिया येथे होणार्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पै. चैतन्य साळुंखे व पै. वेदांत साळुंखे या दोन्ही बंधूंना पोरे कुटुंबीयांन

म्हसवड / वार्ताहर : मलेशिया येथे होणार्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पै. चैतन्य साळुंखे व पै. वेदांत साळुंखे या दोन्ही बंधूंना पोरे कुटुंबीयांनी मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली. मलेशिया येथे होणार्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी मायणी येथील पोरे कुटुंबियांचे निकटवर्तीय सहकारी मच्छिंद्र साळुंखे यांचे दोन्ही चिरंजीव पै. चैतन्य साळुंखे व पै. वेदांत साळुंखे यांची निवड झाली आहे.
साळुंखे कुटुंबीयांची परिस्थिती खूपच हालाखीची असून देखील या कुटुंबाने पैलवानकीचा छंद जोपासला आहे. दोन्हीही मुले आपला छंद जोपासण्यासाठी पडेल ते काम करून कुस्तीसाठी प्रामाणिकपणे मेहनत करत आहेत. त्याचेच फळ म्हणून त्यांची मलेशिया येतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
म्हसवड येथील नासपचे जिल्हाध्यक्ष सुनील पोरे हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. गरजवंताला मदतीचा हात देत असतात याचाच भाग म्हणून त्यांनी चैतन्य व वेदांत या दोघांना म्हसवड येथील शुभम भारत गॅस एजन्सीमध्ये बोलावून त्यांचा यथोचित सत्कार केला. तसेच त्यांना मदत म्हणून 10 हजार रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या उपस्थितीत सुपूर्त करून स्पर्धेस शुभेच्छा दिल्या. यावेळी करण पोरे, अॅड. शुभम पोरे, बाळासाहेब पिसे, पत्रकार पोपट बनसोडे-पाटील, अक्षय देशमुख, ऋषिकेश देशमुख, सागर नामदेव, निखिल माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS