Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या विकास निधी तून उभारलेल्या आरोग्य केंद्राची दुरवस्था   

औरंगाबाद प्रतिनिधी- मागील भाजपा सरकारच्या काळात ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या विकास निधी तून सिल्लोड तालुक्यातील गेवराई सेमी येथे सात व

महिला सरपंचाना मिळणार आदर्श पुरस्कार
छत्रपती संभाजीनगर मध्ये भर रस्त्यात गोळीबार
मुस्लिम आरक्षण मिळावे ः मंत्री सत्तार

औरंगाबाद प्रतिनिधी- मागील भाजपा सरकारच्या काळात ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या विकास निधी तून सिल्लोड तालुक्यातील गेवराई सेमी येथे सात वर्षांपूवी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र आज रोजी या आरोग्य केंद्राच्या प्रचंड दुरवस्था झाली असून गेवराई सेमी परिसरातील गावा च्या नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. सिल्लोड तालुक्यातील गेवराई शेमी येथील लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेली इमारत धूळखात पडून, तालुक्यातील आरोग्य केंद्रच सलाईन वर आहे. आज या आरोग्य केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून परिसरात मोठ्या प्रमाणात दारू च्या बाटल्या आढळून आल्या आहे. त्याच बरोबर पत्ते, निरोध चे पुजके परिसरातच आढळून आले आहे. तसेच लाईट फिटिंग तोडफोड करण्यात आली असून खिडक्यांचे काचाचे तावदाने फोडण्यात आले आहे. महिना भरात एखादं वेळेस हे आरोग्य केंद्र चालू असतं. या मुळे परिसरातील ग्रामस्थाना योग्य प्रकारे आरोग्य सेवा मिळत नसल्याचे नागरिकात मोठा असंतोष पसरला आहे.  विशेष म्हणजे हे प्राथमिक आरोग्य उप केंद्र केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व राज्याचे  कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघातील आहे.  दोन्ही मंत्र्याच्या मतदार संघात चांगल्या पद्धतीने विकासाचं चित्र उभ केलं जात आहे. त्यातच या आरोग्य केंद्राकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकात मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.

COMMENTS