Homeताज्या बातम्यासंपादकीय

दंगलीमागचे राजकारण

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून, जातीय धुव्रीकरण घडवून आणण्याचा कट काही प्रवृत्तींकडून आखण्यात येत असल्यामुळेच सामाजिक उत्सवाच्

काँगे्रसला ‘बळ’ मिळेल का ?
मराठीचा ‘अभिजात’ दर्जा कुठे अडकला ?
सीमावर्ती भागातील गावांच्या विकासाचा प्रश्‍न

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून, जातीय धुव्रीकरण घडवून आणण्याचा कट काही प्रवृत्तींकडून आखण्यात येत असल्यामुळेच सामाजिक उत्सवाच्या वेळी जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या दिवशी उसळलेली जातीय दंगल आणि त्यानंतर विदर्भातील अकोला आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे जो प्रकार घडला, त्यातून या दंगली नियोजनपूर्वक काही शक्ती घडवून आणत असल्याचे दिसून येत आहे. पुरोगामी असलेल्या या महाराष्ट्रात शांतता हवी आहे, आणि विकासाच्या दिशेने झेप घेण्यासाठी या राज्यात या जातीय दंगली नको आहेत. मात्र समृद्ध आणि शांत महाराष्ट्र काही शक्तींना अशांत करायचा असून, आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी सुरू केलेला हा उपद्रव असून, अशा उपद्रवी प्रवृत्तींच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे. मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, सारख्या संवदेनशील ठिकाणी जातीय समीकरणे लक्षात घेता, काही प्रवृत्तींकडून या ठिकाणी दंगली पेटवण्याचे काम सुरू आहे. सामाजिक धुव्रीकरण घडवून आणल्यास आपली राजकीय पोळी भाजून घेतली जाते, त्यामुळे या प्रवृत्तींनी जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हमखास चालवला आहे. त्यामुळे या प्रवृत्तींचे मास्टरमाईंड शोधून त्यांच्या मुसक्या आवळल्यास अशी विषवृल्ली वाढणार नाही.
जातीय दंगेंचा विचार करता, महाराष्ट्रात 1998 ते 2008 या कालावधीत 1,192 जातीय दंग्यांची नोंद झाली आहे. गेल्या दहा वर्षातले देशभरातले हे सर्वाधिक प्रमाण आहे. 1908 ते 2009 या काळात मुंबई शहरात सर्वात जास्त हिंदू-मुस्लिम वाद झाल्याचे स्पष्ट झाले आहे. देशाची आर्थिक राजधानी अशी बिरूदावली मिरवणार्‍या मुंबईतले हे दंग्याचे प्रमाण देशातल्या बाकी कोणत्याही शहरांपेक्षा जास्त आहे. मात्र मुंबईसह राज्याचा विचार करता, 2010-2020 या दशकात दंगे होण्याचे प्रमाण खूपच कमी झाल्याचे दिसून येत आहे. या दशकात महाराष्ट्र शांत होता आणि प्रगतीच्या दिशेने वेगवान झेप घेत होता. मात्र 2019 नंतर कोरोनाची लाट संपल्यानंतर राज्यातील राजकीय अस्थिरता आणि सुरू झालेले दंगे यातून महाराष्ट्र पुन्हा एकदा अस्थिर होतांना दिसून येत आहे. वास्तविक पाहता दंगलीमागे धार्मिक तणाव हा महत्वाचा मुद्दा असून, धार्मिक तणाव हा संवदेनशील विषय असून, हा धार्मिक तणाव काही प्रवृत्तींकडून अचानक निर्माण केला जातो. आणि या तणावामुळे दंगे घडतांना दिसून येत आहे. मात्र तरूणांची माथी भडकावण्याचे काम नेमके कोण करत आहेत, याचा शोध घेण्याची गरज आहे. या दंग्यामुळे तरूण आपले आयुष्य बरबाद करून घेतांना दिसून येत आहे. काही प्रवृत्तींकडून तरूणांची माथी भडकावण्यासाठी त्यांच्यावर विशिष्ट जाती धर्मांचे विचार बिंबवण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र अशांत होतांना दिसून येत आहे. हेट स्पीचप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारवर देखील ताशेरे यापूर्वीच ओढले आहे. त्यामुळे वादग्रस्त वक्तव्य करणार्‍यांवर, तरुणांची माथी भडकावणार्‍यांवर तात्काळा कारवाई करणे गरजेचे आहे. तो अमुक धर्माचा आहे, तो अमुक पक्षाचा आहे, तो अमुक संघटनेचा आहे, म्हणून त्याला पाठीशी घालण्याऐवजी सत्ताधार्‍यांनी त्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे. महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यांचा विचार करता, नोव्हेंबर 2022 मध्ये अमरावतीमध्ये झालेली दंगल, त्यांनतर छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळलेला हिंसाचार आणि त्यानंतर अकोला आणि शेवगावमध्ये झालेला हिंसाचार या बाबी बघता काही प्रवृत्तींना महाराष्ट्र पेटवायचा आहे, त्यांना महाराष्ट्र अशांत करायचा आहे. मात्र अशा प्रवृत्ती ठेचून, महाराष्ट्राला शांत ठेवायचा आहे, आणि तेच महाराष्ट्राच्या हिताचे आहे.

COMMENTS