Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सामाजिक शांतता भंग करणार्‍याविरुद्ध पोलिस स्वतःहून कारवाई करणार

उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांचा इशारा

पाथर्डी ः  समाजमाध्यमावर यापुढील काळात कोणीही दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा वादग्रस्त पोस्ट व्हायरल करून सामाजिक शांततेचा भंग करू नये अन्यथा आम

नगर अर्बन बँकेत पैसे जमा करू नका
जनतेमधून सरपंच निवड प्रक्रिया पुन्हा राबवावी : जय हिंद फाउंडेशनची मागणी
न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालया समोर प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतरांचे धरणे

पाथर्डी ः  समाजमाध्यमावर यापुढील काळात कोणीही दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा वादग्रस्त पोस्ट व्हायरल करून सामाजिक शांततेचा भंग करू नये अन्यथा आम्ही अशा प्रवृत्ती विरोधात स्वतःहून कारवाई करू असा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी दिला.समाज माध्यमातून सध्या एकमेकांच्या नेत्यांविषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होत असल्याने तालुक्यात तणाव निर्माण झाला असून या विषयावर तालुक्यातील काही गावात बंद सुद्धा पुकारण्यात आला होता. या पार्शवभूमीवर आज पाटील व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस स्टेशनला शांतता बैठक आयोजित केली होती.
या बैठकीस अर्जुन शिरसाठ, विष्णुपंत अकोलकर, रणजित बेळगे, पुरषोत्तम आठरे, सुनील परदेशी, रवींद्र वायकर, बंडूशेठ बोरुडे, बंडुपाटील बोरुडे, महेश बोरुडे, उद्धव माने, विष्णुपंत पवार, सचिन वायकर, मुकुंद गर्जे, अर्जुन धायतड्क, माणिक खेडकर, अंकुश कासुळे, राहुल गवळी, महेश काटे, भाऊसाहेब शिरसाठ, योगेश रासने हे उपस्थित होते. या वेळी बोलताना पाटील म्हणाले की, पूर्वीपासून हा तालुका शांतताप्रिय आहे.ही शांतता टिकून राहावी या साठी सर्वानी एकजूट दाखवणे महत्वाचे आहे. समाजात जे वरिष्ठ नागरिक आहे त्यांनी तरुणांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.एखाद्या पक्षाचा नेता,समाजसुधारक यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यास सामाजिक शांतता भंग पावते ती भंग पाऊ नये या साठी सर्वानी एकजूट दाखवावी. सामाजिक शांतता भंग पावल्यास आपल्या सर्वांचेच नुकसान होत असल्याने अशा गोष्टी टाळाव्यात असे पाटील म्हणाले.तर या वेळी बोलताना मुटकुळे म्हणाले की, दोन समाजात मने दुरावली तर उपयोग होणार नाही.एखाद्याने चुकीची पोस्ट सोशल मीडियावर टाकली तर तुम्ही कायदा हातात न घेता आम्हाला सांगा.आम्ही योग्य ती कारवाई करू.सामाजिक सलोखा जपणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. या बैठकी नंतर सर्व नेते एकत्र आले व त्यांनी सामाजिक सलोखा सर्वानीच ठेवावा असे आवाहन समाजमाध्यमावरून केले.

पूर्वी प्रमाणे आपण जसे गुण्यागोविंदाने एकत्र राहत होतो तशाच पद्धतीने आपण येथून पुढील काळात एकत्र राहायला हवे. सामाजिक स्वास्थ्य टिकवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
(अर्जुन शिरसाठ)

COMMENTS