Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वीज वितरण विभागाच्या विद्युत पोलांवरील सी चॅनल चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

धुळे प्रतिनिधी - धुळे वीज वितरण विभागाच्या विद्युत पोलांवरील सी चॅनल व एबी स्विच चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांच्या पोलिसांनी मूसक्या आवळल्या आहेत.

सामान्यांचा विकास हीच आमची एकमेव भूमिका
चिपळूण येथील सुभेदार अजय ढगळे शहीद
नातवानेच केली आजीची हत्या

धुळे प्रतिनिधी – धुळे वीज वितरण विभागाच्या विद्युत पोलांवरील सी चॅनल व एबी स्विच चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांच्या पोलिसांनी मूसक्या आवळल्या आहेत. हे चोरटे रिक्षाच्या साहाय्याने चोरी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून जवळपास ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल या दोघा चोरट्यांसह हस्तगत केला आहे.

दरम्यान, धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने वीज कंपनीचे साहित्य चोरणाऱ्या दोघांना बेड्या ठोकण्यात यश मिळाले आहे. धुळे शहरातील साक्री रोडवर असणाऱ्या विद्युत महामंडळाच्या पोलवरून सी चॅनल चोरीस गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणात वासुदेव अरुण मालचे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणात देखील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी धुळे शहरात राहणारा फजलूर रहमान अन्सारी, अब्दुल वारी अब्दुल शकूर या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांची चौकशी केली असता त्यांनी (एम एच 18 एन 71 78) क्रमांकाच्या रिक्षा मधून चोरलेले साहित्य विल्हेवाट लावण्यासाठी घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

COMMENTS