अहमदनगर ः जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल मध्ये राष्ट्रसंत आनंदऋषीजी म.सा.यांच्या 32 व्य्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आयोजित गरजू रुग
अहमदनगर ः जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल मध्ये राष्ट्रसंत आनंदऋषीजी म.सा.यांच्या 32 व्य्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने आयोजित गरजू रुग्णांच्या विविध रोगांच्या आजारावरील मोफत तपासणी व सवलतीच्या दरातील उपचार अश्या 16 शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून त्यातील 15 व्य्या अस्थिरोग तपासणी व उपचार या शिबिराचे उदघाटन प्रथितयश उद्योजक सुवालालजी बोथरा यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले.या शिबिरासाठी स्व.शकुंतला सुवालालजी बोथरा यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुवालालजी विनोदलालजी व बोथरा परिवाराचे योगदान लाभले होते.
शुभारंभ प्रसंगी बोथरा परिवारातील सदस्य सर्वश्री विनोदलालजी, सुबोध, प्रमोद, प्रकाश, मोहक, ऋषभ, सुधांशु, आशुतोष, श्रेयश व निखिल बोथरा तसेच कविता, संगीता, कल्पना, वैशाली, सेजल, महिमा, रविना बोथरा तसेच डॉ. वसंत कटारिया, डॉ. प्रकाश कांकरिया,सुभाष मुनोत, सतीश उर्फ बाबूशेठ लोढा, संतोष बोथरा, प्रशासकीय वैध, अधि. डॉ. आशिष भंडारी, प्रकाश छल्लानी, आदी मान्यवर उपस्थित होते. संतोष बोथरा यांनी स्वागत करून हॉस्पिटलच्या वैधकीय सेवा कार्याविषयी सविस्तर माहिती दिली. ते पुढे म्हणाले कि स्वर्गीय शकुंतलाताई या अतिशय प्रेमळ व धार्मिक व सेवाभावी प्रवृत्तीच्या होत्या.अंतिम क्षणांपर्यंत त्यांनी हा भाव जपला होता.त्याला अनुसरूनच बोथरा परिवारांची वाटचाल सुरु असून आजचे शिबिराचे आयोजन त्याचेच द्योतक असल्याचे सांगून नेप्ती रोडवर नव्याने उभारल्या जात असलेल्या वर्धमान महावीर युनिव्हर्सिटीचे कामही मोठ्या प्रगती पथावर असून या पुण्यकर्माच्या कार्यातही सुवालालजी बोथरा व परिवाराने युनिव्हर्सिटीच्या क्लास रूमसाठी मोठे योगदान दिले असल्याचे सांगितले व सुवालालजी बोथरा परिवाराचे आभार मानले. या शिबिराचे आयोजक सुवालालजी बोथरा यांनी बोलताना आनंदऋषीजी हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ,डॉक्टर्स,योगदाते,व जैन सोशल फेडरेशनच्या सभासदांचे आभार व्यक्त केले ना भूतो ना भविष्यती असे रुग्णाच्या सेवेचे पुण्यकार्य या हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरु असून हे कार्य असेच सुरु सुरु राहावे यासाठी आचार्य श्रीं आनंदऋषीजी महाराजांचे आशीर्वाद आहेतच व यापुढेही आमच्या सारख्यांचे योगदानही सुरूच राहील असे सांगून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. मोहक बोथरा म्हणाले कि, अस्थिरोग हा रोग जसे वय वाढत जाते तसं-तसे या अस्थिरोगांबाबतीतील जागरूकता वाढीस लागली पाहिजे.भविष्यतील धोके टाळण्यासाठी तातडीने तपासणी करावी व त्यावर उपचार करून आहारामध्ये आवश्यक ते बदल केले पाहिजेत जेणे करून अस्थिरोगांवर मुक्ती मिळेल हि जागरूकता या शिबिराच्या माध्यमातून वाढीस लागेल अशी भावना व्यक्त करून आनंदऋषीजी परिवाराचे आभार व्यक्त केले. शिबिरात अस्थिरोग तज्ञ् डॉ. विशाल शिंदे, डॉ. रोहन धोत्रे, स्पाईन सर्जन डॉ. अमित सुराणा, डॉ. अक्षय गदिया यांनी रुग्णाची तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले या शिबिराचा 167 रुग्णांनी लाभ घेतला. प्रकाश छल्लाणी यांनी आभार मानले.
COMMENTS