Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वज्रेश्‍वरी मातेच्या यात्रोत्सवास आजपासून सुरूवात

राहाता ः राहाता तालुक्यातील एकरुखे गावातील हाकेला धावनारी नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या माता वज्रेश्‍वरी यात्राउत्सव आज पासुन सुरु होत आसुन

भाजपकडून लोकशाही व संविधान संपवण्याचा प्रयत्न ः थोरात
समृद्धी गायकवाडचे नवोदय परिक्षेत घवघवीत यश
ओबीसी फॅक्टर पुस्तक समाजाला दिशादर्शक ठरेल

राहाता ः राहाता तालुक्यातील एकरुखे गावातील हाकेला धावनारी नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या माता वज्रेश्‍वरी यात्राउत्सव आज पासुन सुरु होत आसुन दोन दिवसीय यात्रा उत्सवाची जय्यत तयारी श्रीराम व वज्रेश्‍वरी देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ  एकरुखे यांच्या वतीने करण्यात आल्याची माहीती देवस्थान ट्रस्टचे कार्याध्यक्ष संदिप क्षीरसागर यानी माध्यमाशी बोलताना दिली.
राहाता तालुक्यातील एकरुखे गावात हजारो वर्षांपूर्वीचे भव्य दिव्य वज्रेश्‍वरी देवीचे पुरातन मंदिर आहे.या देवीचा यात्रा उत्सव सोमवार दि 29 ते मंगळवार दि 30 एप्रिल या दोन दिवसाच्या कालावधीत विविध धार्मिक पारंपारिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने संपन्न होणार आहे. यात्रेच्या मुख्य दिवस सोमवार दि 29  रोजी सकाळी 6 वा पुणतांबा या ठिकाणाहून पायी आणलेल्या गंगेच्या पवित्र जलाची सवाघ्य रथातुन भव्य मिरवणूक व जलपुजन सकाळी ठिक 8  ते 9 या वेळात देवीचे  मंगल स्नान व महाआरती  तद्नंतर  देवीच्या पारंपरिक असलेल्या अंलकाराची गावातुन भव्य मिरवणुक काढण्यात येणार आसुन जिल्हा परिषद प्राथमिक  शाळा एकरुखे येथील विद्यालयचे  झांझपथक  सादर केले. जाणार असून मिरवणुकी नंतर वजेश्‍वरी मातेच्या अंलकाराचे पूजन व अंलकार परिधान दुपारी 2 वा भव्य बैलगाडा शर्यत कार्यक्रम दुपारी 4 ते 6 या वेळात भाविक भक्ताना महाप्रसाद वाटप कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालयासमोर केले जाणार आहे. सायंकाळी 6 वाजता संपूर्ण यात्रेचे मुख्य आकर्षण असलेले देवीच्या  घड्याची (घागर) अतिभव्य मिरवणूक व शोभेचे दारूकाम आयोजित केले आहे. रात्री 8 वाजता देवीच्या काठीच्या डफाच्या गजरात मिरवणुक काढली जाणार आहे.रात्री 10 वाजता कलगीतुर्‍याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मंगळवार 30 रोजी सकाळी 6  वा देवीचा महाआरती व पुजन    सकाळी 8 वा.हजेरीचा कार्यक्रम होईल. दुपारी 3 ते. 6 जंगी कुस्तयाचा हंगामा पार पडणार आहे. रात्री 9 ते 12 रुपचंद्रिका मालती इनामदार लोकनाट्य तमाशा मंडळ नारायणगांव याचा लोकनाट्य सादर कार्यक्रम आयोजित केला आहे. यात्रा उत्साहाची जय्यत तयारी सुमारे एक महिन्यापासून समस्त ग्रामस्थ एकरुखे, गावातील विविध मित्र मंडळ, भजनी मंडळ. व श्रीराम व वजेश्‍वरी देवस्थान ट्रस्ट एकरूखे याच्या माध्यमातून केली जाते. या दोन दिवसीय यात्रोत्सव काळात पंचक्रोशीतील भाविक भक्तानी उपस्थित राहुन आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक, पारंपारिक, सांस्कृतिक आदी कार्यक्रमांबरोबरच देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान ट्रस्ट कार्याध्यक्ष संदीप क्षीरसागर यानी केले आहे.

पंचक्रोषीतील जागृत देवस्थान व नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या माता वज्रेश्‍वरीच्या नवसपूर्तीसाठी असंख्य भाविक राज्य भरातून यात्रे साठी येत असतात. यात्रेचे वैषिष्ट म्हणजे परगावी स्थित किंवा नोकरीनिमित्ताने असलेली गावकरीही आवर्जुन मातेच्या दर्शनास येतात.
देवेंद्र भवर, माजी चेरमन कृषी उत्पन्न बाजार समिती राहाता

COMMENTS