Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. जयंत पाटील जे नाव देतील तो उपनगराध्यक्ष : शहाजीबापू पाटील

आज स्वीकृत नगरसेवक निवडीसह आभार सभाईश्‍वरपूर / प्रतिनिधी : उरुण-ईश्‍वरपूर नगरपरिषदेची शुक्रवारी सभा होणार आहे. या सभेत उपनगराध्यक्ष, स्वीकृत नग

सातार्‍यातील जिल्हा कारागृहातील कैद्यांमध्ये हाणामारी
होला पक्षाची शिकार करणार्‍या तिघांवर गुन्हा; मुद्देमाल जप्त
शामगाव येथे पिण्याच्या पाण्याचे एटीएम

आज स्वीकृत नगरसेवक निवडीसह आभार सभा
ईश्‍वरपूर / प्रतिनिधी : उरुण-ईश्‍वरपूर नगरपरिषदेची शुक्रवारी सभा होणार आहे. या सभेत उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी होणार आहेत. स्वीकृत नगरसेवक पदासाठी संग्राम दिलीपराव पाटील, सचिन अशोकराव कोळी यांची नावे निश्‍चित केली आहेत. विजय संपतराव देसाई यांचा तिसरा अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षातर्फे दाखल करण्यात आले आहेत. उपनगराध्यक्ष पदाचे नाव आ. जयंत पाटील जे देतील तेच नाव उपनगराध्यक्ष पदासाठी अंतिम करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शप) चे शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
शहाजीबापू पाटील म्हणाले, 9 वर्षानंतर उरुण-ईश्‍वरपूर नगरपालिकेची निवडणूक झाली आहे. नगरपालिकेत पाच वर्षे आम्ही विरोधी बाकावर राहून काम केले आहे. शहरातील विकासाचे मुद्दे सत्ताधार्‍यांना पटवून देण्यासाठी आम्ही सर्व राष्ट्रवादी नगरसेवकांनी प्रयत्न केले आहेत. गेली 35 वर्षे आनंदराव मलगुंडे हे नगरपालिकेत कार्यरत आहेत. नगराध्यक्ष पदासाठी त्यांची एकमुखी राष्ट्रवादी पक्ष्याच्या नगरसेवकांनी मागणी केली होती. त्यानंतर आ. जयंत पाटील यांनी त्यांचे नगराध्यक्ष पदाचे नाव घोषित केले. शुक्रवारी दुपारी 12 वाजता पालिका सभेत उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी दोन वर्षासाठी होणार आहेत. त्यानंतर दुपारी 1 वाजता पालिका आवारात आ. जयंत पाटील यांची जाहीर आभार सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे केले आहे.
नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे म्हणाले, गेले 15 दिवस झाले नगरपालिकेतील कामकाज सुरू केले आहे. शहरातील विविध प्रश्‍न, समस्या, आव्हानाला सामोरे जाण्याचे काम सुरू आहे. शहरात नागरी सुविधा देण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. संत गाडगेबाबा स्वच्छ भारत अभियानात उरुण-ईश्‍वरपूरचा पहिला नंबर आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
या पत्रकार बैठकीला राजारामबापू बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, माजी नगराध्यक्ष भगवान पाटील, वाळवा शिक्षण संस्थेचे सहसचिव अ‍ॅड. धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी पक्षाच्या गटनेत्या, माजी नगराध्यक्ष अरुणदेवी पाटील, नगरसेवक खंडेराव जाधव, सुभाष सूर्यवंशी, बाळासाहेब कोळेकर, स्वरूप मोरे, लता कुर्लेकर, शुभांगी शेळके, कांचन कोळेकर, पुष्पलता खरात, सुप्रियाताई पाटील, पल्लवी नागे, बाळासाहेब जाधव, सचिन हांडे, सुनील मलगुंडे, सविता आवटे, शंकरराव चव्हाण उपस्थित होते.

दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रिकारण?
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे तिसर्‍या स्विकृत नगरसेवकाच्या निवडीवर सहमतीची चर्चा चालू आहे काय? यावर शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील म्हणाले, तसे काही नाही. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा चालू असेल, तर आम्हाला माहित नाही. तशा कोणत्याही सूचना आम्हाला नाहीत.

COMMENTS