श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात शहराच्या पूर्वेला दर सोमवारी मोठा आठवडे बाजार भरतो. श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिक आठवड
श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरात शहराच्या पूर्वेला दर सोमवारी मोठा आठवडे बाजार भरतो. श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी व नागरिक आठवडे बाजारासाठी येत मोठ्या संख्येने येत असतात. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत.
बाजार तळात कुठल्याही प्रकारचा मुरुम अथवा सपाटीकरण केलेले नाही त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचत असून सर्व बाजारळ चिखलमय झाला असल्याने ग्राहकांसह भाजी विक्रेते यांना धड बसताही येत नसल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून नागरीकांना बाजारात फिरणेही मुष्किल झाले आहे. नगरपालिकेने कमिटीची कर वसुलीचा ठेका खाजगी ठेकेदाकडे दिला आहे. प्रती कॅरेट 10 रुपया प्रमाणे विक्रेते यांच्या कडून मोठ्या प्रमाणावर कर वसूल केला जात आहे मात्र बाजारात पाण्याची व बसण्याची सोय नसल्याने विक्रेते व नागरिक नगरपालिकेवर नाराजी व्यक्त करत आहेत. नगरपालिका प्रशासन मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
COMMENTS