कोपरगाव : विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी लोकसाहित्य, ग्रामीण संस्कृती आणि परंपरेतील ज्ञान यांचे महत्त्व अधोरेखित केले. आई जात्यावर म्हणत अ

कोपरगाव : विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी लोकसाहित्य, ग्रामीण संस्कृती आणि परंपरेतील ज्ञान यांचे महत्त्व अधोरेखित केले. आई जात्यावर म्हणत असलेल्या ओव्या, बहिणाबाई चौधरी यांच्या कविता आणि लोकपरंपरेतील साहित्य यांमधून जीवनाचे तत्त्वज्ञान व्यक्त होत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील ज्येष्ठांकडून अशा ओव्या, कथा आणि लोकपरंपरा जतन कराव्यात,” असे प्रतिपादन ग्रामीण कवी इंद्रजीत भालेराव केले. ते येथील रयत शिक्षण संस्थेच्या ‘एस.एस.जी.एम. कॉलेजचा वार्षिक पारितोषिक व कै. सौ. सुशीलाबाई शंकरराव काळे आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण’ समारंभ नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ऍड. भगीरथ शिंदे यांनी भूषविले.
ऍड. भगीरथ शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणात, महाराष्ट्रातील विठ्ठल वाघ आणि ना.धो. महानोर यांच्या काव्यपरंपरेतील इंद्रजीत भालेराव हे महत्त्वाचे कवी असल्याचे नमूद करत शेती, शेतकरी आणि ग्रामीण जीवन या विषयांवर त्यांनी सातत्याने लेखणी चालविल्याचे सांगितले. तसेच भालेराव यांच्या कवितांवर बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेचा प्रभाव जाणवतो, असे सांगत त्यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी केले. प्राचार्यांनी आपल्या प्रस्ताविकांमध्ये पाहुण्यांचा शब्दसुमनांनी स्वागत करून, कर्मवीरांची स्वप्नातील रयत प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न एस.एस. जी.एम.महाविद्यालय करत आहे. असे आवर्जून सांगितले. महाविद्यालयाचे अहवाल वाचन प्रा. संजय शिंदे यांनी केले.

COMMENTS