Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रिक्षात बसलेल्या प्रवाशी महिलेची पर्स पळवली

अहमदनगर/प्रतिनिधी ः घरी जाण्यासाठी रिक्षात - बसलेल्या महिलेच्या मांडीवरील पर्स मोटारसायकलवर आलेल्या अनोळखी चोरट्याने बळजबरीने हिसकावून चोरुन नेल्

रांगोळीतून येऊ लागला सुगंध…पाहणारे झाले मंत्रमुग्ध
पाच जणांचा खून करून कुटुंबप्रमुखाची आत्महत्या
…तर, आमदारांच्या निवासासमोरच राहुटी टाकणार

अहमदनगर/प्रतिनिधी ः घरी जाण्यासाठी रिक्षात – बसलेल्या महिलेच्या मांडीवरील पर्स मोटारसायकलवर आलेल्या अनोळखी चोरट्याने बळजबरीने हिसकावून चोरुन नेल्याची घटना नगर ते छत्रपती संभाजीनगर रोडवर असलेल्या कविजंग लॉन समोर घडली.
याबाबत रेणुका अशोक गायके ( रा. धनगरवाडी, जेऊर, ता. नगर ) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रेणुका गायके या कार्यक्रमानिमित्ताने नगरमध्ये आलेल्या होत्या. कार्यक्रम आटोपून त्या घराकडे जाण्यासाठी कवीजंग लॉनजवळ
रिक्षात बसल्या. त्यावेळी पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या अनोळखी इसमाने रिक्षा जवळ येवून रेणुका गायके यांच्या मांडीवर असलेली पर्स हिसका मारुन पळवून नेली. या पर्समध्ये 12 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने, 8 हजार रुपयांची रोकड व 12 हजार रुपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल असा 32 हजारांचा ऐवज होता. या प्रकरणी फिर्यादी गायके यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं. वि.क. 392 प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS