Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरकारने दिलेले पॅकेज ही शेतकर्‍यांची थट्टा ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

छ. संभाजीनगर : राज्यात शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी शेतकरी एकवटला होते, मला वाटले काहीतरी होईल. पण मुख्यमंत्री परत एकदा कोपर्‍याला गुळ लावला आणि 3

कैद्यांमध्ये राडा बॉम्बस्फोटातील आरोपीची हत्या
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात ‘राष्ट्रीय शिक्षण दिन’ निमित्त विशेष व्याख्यान
घरगुती ग्राहकांसोबत औद्योगिक आणि व्यावसायिक वीजदरात कपात

छ. संभाजीनगर : राज्यात शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी शेतकरी एकवटला होते, मला वाटले काहीतरी होईल. पण मुख्यमंत्री परत एकदा कोपर्‍याला गुळ लावला आणि 30 जूनची तारीख दिली. पहिले कर्ज फेडण्याची ताकद आहे. जमीन खरडवून गेली, त्यात माती मिळालीये? सरकारने दिलेले पॅकेज ही थट्टा असल्याचा हल्लाबोल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केला. उद्धव ठाकरे बुधवारपासून चार दिवस मराठवाड्याच्या दौर्‍यावर असून त्यांनी दगाबाज रे संवाद दौर्‍याच्या माध्यमातून शेतकर्‍यांशी थेट संवाद साधण्यास सुरूवात केली आहे.
यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, पीक विम्याचे 40 ते 50 हजार मिळायला हवे होते. मोसंबीला 80 हजार मिळायला हवे होते. कापसाला वेगळे हवे होते. पीक विम्याचे पैसे मिळाले. तुम्ही खोटं बोलत आहेत. अकोल्यात 2 रुपये तीन रुपये मिळाले. पालघरमध्ये अडीच रुपये मिळाले. शेतकर्‍यांची थट्टा सुरू आहे. जेवढे तुम्ही भरले तेवढेही मिळाले नाही. सहा रुपये आले. बँकेचे स्टेटमेंट आहे. ही शेतकर्‍यांची थट्टा चाललीये, असेही ठाकरे म्हणाले.

COMMENTS