माहूर प्रतिनिधी - पेसा व नक्षलप्रवणआदिवासी क्षेत्रात मोडणार्या मदनापूर ता. माहूरच्या सुशिक्षित लफडेबाज व ग्रामसेवक एस. एल पेंटेवाड यांनी संगनमता
माहूर प्रतिनिधी – पेसा व नक्षलप्रवणआदिवासी क्षेत्रात मोडणार्या मदनापूर ता. माहूरच्या सुशिक्षित लफडेबाज व ग्रामसेवक एस. एल पेंटेवाड यांनी संगनमताने उच्चशिक्षित अपंग, अत्यल्पभूधारक तसेच मूळ आदिवासी गोंड समाजाचे गजानन मन्सूर पेंदोर यांचे मूळ नमुना न. 8 वरील सर्वच पोट हिस्सेदाराची नावे नजरेआड करून बनावट नमुना नं. 8 दस्तऐवजाव्दारे पंचफुला बाबुराव पवार या उच्चभ्रू महिलेस घरकुलाचा पहिला हप्ता दिल्याने सदरील अपंग व्यथित होऊन त्याने सर्व संबधिताकडे न्याय देण्याच्या अपेक्षा व्यक्त केली आहे . मुख्यमंत्री, प्रधान मुख्य सचिव, विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केले आहे. विशेष उल्लेखनिय बाब म्हणजे किनवट- माहूर विधानसभा मतदारसंघाचे आ. भीमराव केराम हे त्या समाजाचे असून ते आपल्या समाजातील अपंग, गरीब मूळ आदिवासीला न्याय देतील की, धनदांडग्या ग्रामसेवकाला पाठीशी घालतात? याकडे मदनापूर परिसरातील नागरिकाचे लक्ष लागले आहे.
अपंग आदिवासी शेतकर्याच्या जागा मालकीच्या नमुना नं. 8 मध्ये सरपंच व ग्रामसेवक यांच्या संगनमताने दुसर्या व्यक्तीच्या नावाने परस्पर नमुना न. 8 तयार करून शासनास सादर करून शासनासह मूळ आदिवासी अपंग व्यक्तीची खोट्या दस्तऐवजांव्दारे गंभीर फसवणूक केल्याने गुन्हे दाखल होण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे. तक्रारीसोबतच मदनापूर ग्रामपंचायतच्या माझे नावाचा ,मूळ नं. 8 तसेच पंचफुला बाबुराव पवार यांचे नावे कुठलाही अधिकार नसतांना बेकायदेशीरपणे ग्रामसेवकांनी बनविलेला बनावट व बोगस नमुना न. 8 चा उतारा, 45 टक्के अपंग असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडून सुद्धा गेंड्याची कातडी पांघरून झोपलेले पंचायत समिती माहूरचे प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहेत. सदर बाधिताकडे दोन एकर शेती असून, चंद्रमोळी झोपडीत राहतो, शेती व मजुरी करून उदरनिर्वाह करतो. अपंग असल्याने त्याचे शेत पण पडीत आहे. असे असतांना देखील मदनापूर गावचा लफडेबाज पुढारी तसेच अनेकवेळा निलंबित झालेले ग्रामसेवक एस.एल.पेंटेवाड यांनी बाधीताच्या मालमत्ता क्र. 71 हा ग्रा.प. रेकॉर्डला असतांना देखील ग्रा.प. कार्यालयाच्या बाहेर परस्पर नवा नमुना नं. 8 पंचफुला बाबुराव पवार उच्चभ्रू समाजातील महिलेला नमुना नं. 8 चा उतारा देऊन घरकुल लाटले आहे.
COMMENTS