Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वृद्धाने केला चिमुरडीवर अत्याचार

पुणे ः बदलापूर येथील घटना ताजी असतांना पुण्यात एका 78 वर्षीय वृद्धाने अवघ्या 7 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना धनकवडी परिसरा

श्री नागेश विद्यालयाचे नाव झळकले इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये
जमिन खरेदीप्रकरणी भाजप आमदार जयकुमार गोरेविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
शेफ जनजागृतीसाठी भारत भ्रमंती करणारा शेफ अॅलन डीमेलो नाशकात

पुणे ः बदलापूर येथील घटना ताजी असतांना पुण्यात एका 78 वर्षीय वृद्धाने अवघ्या 7 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना धनकवडी परिसरात घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या 61 वर्षीय आजीच्या तक्रारीनुसार सहकारनगर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधुकर पिराजी थिटे (वय-78,रा.धनकवडी,पुणे) असे आरोपीचे नाव आहे. त्यांच्यावर एका 7 वर्षीय चिमुकलीवर स्वतः नग्न होत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर आरोपीने मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवून या घटनेची कुठेही वाच्यता न करण्याची धमकीही दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी आरोपी ज्येष्ठ नागरिकाच्या ओळखीचीच आहे.

COMMENTS