Homeताज्या बातम्यादेश

देशात वाघांची संख्या 6 हजारापेक्षा अधिक

म्हैसूर/वृत्तसंस्था ः देशामध्ये एक वेळ अशी होती, जेव्हा वाघांची संख्या बोटांवर मोजण्याइतकी राहिली होती, पण आजमितीस देशातील वाघांच्या संख्येने 3 ह

संततधार पावसाने विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर कोसळले.
मिचाँग चक्रीवादळापूर्वीच फटका
मराठी पत्रकार परिषदेच्या अकोले तालुकाध्यक्षपदी गणेश आवारी

म्हैसूर/वृत्तसंस्था ः देशामध्ये एक वेळ अशी होती, जेव्हा वाघांची संख्या बोटांवर मोजण्याइतकी राहिली होती, पण आजमितीस देशातील वाघांच्या संख्येने 3 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. रविवारी देशातील वाघांच्या संख्येची नवीन आकडेवारी समोर आली आहे. टायगर प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हैसूर येथे एका कार्यक्रमात वाघांची ताजी आकडेवारी जाहीर केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, नव्या आकडेवारीनुसार 2022 च्या अखेरपर्यंत भारतात वाघांची संख्या 3167 झाली आहे. भारताने 5 दशकांपूर्वी 1 एप्रिल 1973 रोजी वाघ वाचवण्याची सर्वात मोठी मोहीम सुरू केली होती. प्रोजेक्ट टायगर असे त्याला नाव देण्यात आले. तेव्हापासून देशातील वाघांची संख्या सातत्याने वाढत असून आज जगातील 70 टक्के वाघ एकट्या भारतात आहेत. दरवर्षी ही लोकसंख्या 6 टक्क्यांनी वाढत आहे. प्रकल्पाच्या सुरुवातीला 9 व्याघ्र प्रकल्पांचा त्यात समावेश करण्यात आला होता. आज 50 वर्षांनंतर 53 व्याघ्र झाले आहेत. हे प्रकल्प 75,000 चौरस किमी क्षेत्र व्यापतात. एवढ्या मोठ्या परिसरात वाघांची गणना करणे सोपे काम नाही. 1973 मध्ये जेव्हा प्रकल्प सुरू झाला तेव्हा वनविभागाचे कर्मचारी वाघाच्या पायाचे ठसे चिन्हांकित करण्यासाठी काच आणि बटर पेपर वापरत होते. मात्र आता अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे वाघांची संख्या मोजणे सहज शक्य झाले आहे.

COMMENTS