Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव शहरात वाढले चोर्‍याचे प्रमाण

दोन गुन्हे दाखल शहर पोलिसांसमोर तपास लावण्याचे आव्हान

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन विविध चोरीचे गुन्हे दाखल झाले असून पहिल्या गुन्ह्यात महावितरण कंपनीच्या एका रोहित्रां

आता विश्‍वात्मके देेवे…गृहिणीने हाताने लिहिली ज्ञानेश्‍वरी.
सीनाचे आवर्तन सोडण्याचे आ. राम शिंदे यांचे आदेश
Akole : कळसुबाई शिखरावर देवी भक्तांचा जनसाग | LokNews24

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन विविध चोरीचे गुन्हे दाखल झाले असून पहिल्या गुन्ह्यात महावितरण कंपनीच्या एका रोहित्रांच्या तांब्याच्या तारेसह ऑइलची 54 हजार 600 रुपयांची चोरी झाल्याचा गुन्हा तारतंत्री प्रताप ननवरे यांनी दाखल केला आहे तर दुसर्‍या घटनेत राजेश बिहारीलाल लोंगाणी यांच्या 30 हजार रुपये किमतीच्या ऍक्टिव्हा गाडीची (क्रं.एम.एच.12 पी.एफ.2676) चोरी झाली आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहर आणि तालुक्यात चोर्‍यांचे प्रमाण मोठया प्रमाणावर वाढले आहे. उन्हाळ्यात सह्याद्री कॉलनीत, निवारा परिसरात व साईनगर परिसरात तीन कार एकाच रात्री लंपास केल्या होत्या.या शिवाय निवारा परिसरात एक सुमारे दोन लाखांची चोरी झाली होती. या शिवाय कोपरगाव बस स्थानक व अन्य नागरिकांना रात्री व पहाटेच्या वेळी फिरण्याच्या मार्गावरील चैन ओरबडण्याच्या व सोन्याचे दागिने पळविण्याचा घटनांची गणतीच नाही.बस स्थानकावरील चोर्‍या वेगळ्याच आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या चोर्‍या वरचेवर वाढत चालल्या होत्या. याला आळा घालणे गरजेचे असताना त्यावर कुठलीही कार्यवाही होताना दिसत नाही.अशाच दोन घटना उघड झाल्या आहेत.त्यातील पहिली घटना हि विवेकानंदनगर येथील असून येथे सेवानिकेतन शाळेजवळ रहिवासी असलेलं फिर्यादी इसम राजेश बिहारीलाल लोंगाणी यांच्या ऍक्टिव्हा गाडीची चोरी त्यांच्या राहत्या घरासमोरून 20 नोव्हेंबर रोजी रात्री 9.30 नंतर कधीतरी झाली आहे.त्यांनी आपल्या गाडी चोरीचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात क्रं.536/2023 भा.द.वि.कलम 379 अव्यये दाखल केला आहे. दरम्यान दुसरा गुन्हा हा महावितरण कंपनीचा झाला असून यातील तारतंत्री प्रताप भानुदास ननवरे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात क्रं.537/2023 विद्युत अधिनियम 2003 चे कलम 136 अन्वये दाखल केला आहे.त्यात त्यांनी महावितरण कंपनीच्या रोहित्रांची 30 हजार रुपये किमतीची तांब्यांची तार,व 24 हजार 600 रुपयांच्या विद्युत रोहित्रातील ऑइल चोरी गेले असल्याचे म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,पोलीस नाईक बी.एस.कोरेकर आदींनी भेट दिली आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी वरील कलमा प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बी.एस.कोरेकर व पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करत आहेत.

COMMENTS