नवे जिल्हाधिकारी कार्यालय राहिले दिमाखात उभे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवे जिल्हाधिकारी कार्यालय राहिले दिमाखात उभे

उदघाटनाचे नियोजन सुरू, प्रत्यक्ष कामकाजाला नवे वर्ष उजाडणार

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यात दोन्ही काँग्रेसची सत्ता असतानाच्या काळात म्हणजे 20213मध्ये भूमिपूजन झालेले नगरचे नवे जिल्हाधिकारी कार्यालय तब्बल 8 वर्षां

Ahmednagar : एसटी कामगारांचा विविध मागण्यासाठी बेमुदत संप (Video)
देवळाली प्रवरात तलवारी फिरवत तरूणांची दहशत
आ. जयंत पाटील यांनी एसटीची बस चालविल्याप्रकरणी आगार प्रमुखासह चालकावर कारवाईची भाजपाची मागणी; माझ्यावर खुशाल गुन्हा दाखल करा : आ. जयंत पाटलांचे प्रत्युत्तर

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्यात दोन्ही काँग्रेसची सत्ता असतानाच्या काळात म्हणजे 20213मध्ये भूमिपूजन झालेले नगरचे नवे जिल्हाधिकारी कार्यालय तब्बल 8 वर्षांनी दिमाखात उभे राहिले आहे. ज्यांनी या इमारतीचे त्यावेळी भूमिपूजन केले, त्या महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याच उपस्थितीत आता या नव्या इमारतीचे उदघाटन होणार आहे. प्रशासकीय पातळीवर सध्या लगबग सुरू असून, नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे मंगळवारी (7 डिसेंबर) उदघाटन करण्याचे प्रस्तावित आहे. पण अद्याप ही तारीखही निश्‍चित नाही, असे प्रशासनाद्वारे स्पष्ट केले गेले आहे.
शहराच्या वैभवात भर घालणार्‍या नूतन जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या उद्घाटनाची तारीख काढण्याची प्रशासकीय पातळीवर याबाबत लगबग सुरू झाली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत प्रत्यक्षरित्या या इमारतीचे उदघाटन केले जाणार आहे. तर त्याचवेळी मुंबईतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीने सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येते.
मगर-औरंगाबाद रस्त्यावरील शासकीय विश्रामगृहामागे जिल्हाधिकारी कार्यालयाची नवी इमारत दिमाखात उभी राहात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासाठी भूसंपादन विभागाची जागा निश्‍चित करण्यात आली होती. या ठिकाणी नवीन जिल्हाधिकारी कार्यालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या आठ वर्षापासून या इमारतीचे काम सुरू आहे. पाच मजली इमारत बांधण्यात आलेली आहे. अतिशय भव्य-दिव्य अशी ही इमारत उभारण्यात आलेली आहे. याकरिता राज्य सरकारने साडेपाच कोटी रूपयांचा निधी मंजूर केलेला आहे.
विशेष म्हणजे त्यावेळचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात या नव्या इमारतीस मंजुरी मिळालेली आहे. आता, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कार्यरत असून या सरकारमध्येही ते महसूलमंत्री आहेत. महसूल विभागाने डिजिटल सात-बारा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सध्या राज्यभर सुरू आहे. नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. सात-बारा उतारा सर्वसामान्यांच्या लक्षात राहणार आहे. या पार्श्‍वभूमीवर नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उदघाटन सात डिसेंबरला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व कार्यालय नव्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात येणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्रशासकीय पातळीवर लगबग सुरू झाली असून नुकतीच प्रशासकीय अधिकार्‍यांसह सार्वजनिक बांधकाम व महावितरणच्या अधिकार्‍यांनी नव्या इमारतीस भेट देऊन पाहणी केली. मागील महाराष्ट्रदिनी जिल्हाधिकारी कार्यालय स्थलांतराचा निर्णय झाला होता. मात्र, त्यावेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. आता, या महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालय स्थलांतर करण्यात येणार आहे. नवी इमारत ही पाच मजली असून जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकार्‍यांची दालने येथे असणार आहेत.

COMMENTS