गणेशनगर प्रतिनिधी - रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुल राहाता या ठिकाणी संविधान सप्ताहच्या निमित्ताने आयोजित निबंध स्पर्धा, चित्रकला स्प
गणेशनगर प्रतिनिधी – रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुल राहाता या ठिकाणी संविधान सप्ताहच्या निमित्ताने आयोजित निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. विविध शाळेतून आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. पथनाट्य मध्ये शारदा शैक्षणिक संकुलास प्रथम क्रमांक मिळाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहाता न्यायालयाच्या न्यायाधीश आदिती नागोरी वरिष्ठ स्तर दिवाणी या होत्या. आपल्या अध्यक्षीय मनोगतामधून त्यांनी विद्यार्थ्यामार्फत संविधानाने दिलेली हक्क व कर्तव्य समाजापर्यंत पोहोचतील असा आत्मविश्वास व्यक्त केला.
विद्यार्थ्यांनी हक्क व कर्तव्याचे पालन केली तर आदर्श समाज निर्माण होऊ शकतो आणि याच उद्देशाने या सप्ताहाच्या आयोजन केली आहे. विद्यार्थी हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. तालुक्यातील 272 शाळेपर्यंत संविधान दिनाच्या निमित्ताने आम्ही पोहोचलो असे त्या बोलल्या. याप्रसंगी एस. व्ही .खैरे दुसरे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कायद्याने दिलेली अधिकार माहिती होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले. मूलभूत हक्क व कर्तव्य आपणाला माहिती असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच आपली किंमत तयार केली पाहिजे. अभ्यास करून किंमत तयार करता येते .विद्वत्ता मिळाली की जीवनामध्ये यश प्राप्ती होते असे सांगितले. राहाता पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांनी बालविवाह विरोधातील शपथ विद्यार्थ्यांना दिली त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संविधानाने आपणाला अधिकार दिले परंतु आपल्या कर्तव्याची जाणीव आपल्याला नाही. आपण चुकीच्या घटनेला विरोध केला पाहिजे. मोबाईलचा अतिवापर विद्यार्थ्यांनी टाळला पाहिजे ,बालविवाह करणे, करू देणे किंवा बालविवाह प्रोत्साहन देणे कायद्याने गुन्हा आहे असे सांगितले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शारदा शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष रमेश शिंदे होते. त्यांनी आपल्या मनोगतातून संविधानाची माहिती समाजापर्यंत पोहोचली पाहिजे, विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन संविधानाविषयी माहिती करून घेणे गरजेचे आहे, आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करू नये, न्यायदेवता न्याय देण्याचे काम करतात परंतु समाजातील काही घटक आपले कर्तव्य विसरून फक्त हक्क सांगतात, त्यासाठी संविधानाचा अभ्यास करणे गरजेचे आहे असे सांगितले. या कार्यक्रमाचे नियोजन शारदा शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य संजय तरटे यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले . याप्रसंगी देशपांडे न्यायाधीश कनिष्ठ स्तर,एस.एस. मुलानी ,चौथी दिवाणी न्यायाधीश, श्रीमती ए.ए. कुलकर्णी तिसरे दिवाणी न्यायाधीश, कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्या विद्या गोडगे, प्राचार्य निशा, पर्यवेक्षक अशोक कडनोर, प्रा.राजेंद्र पटारे, सुनंदा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती कवडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रमेश आहेर व जोशी यांनी केले आभार प्रा. शरद गमे यांनी मानले.
COMMENTS