कोल्हापूर ः साखरपुडा झाल्यानंतर मित्रासोबतच लिव्ह इनमध्ये राहण्याचा हट्ट धरणार्या एका उच्चशिक्षित तरुणीचा आई, भाऊ व मामाने केलेल्या बेदम मारहाणी

कोल्हापूर ः साखरपुडा झाल्यानंतर मित्रासोबतच लिव्ह इनमध्ये राहण्याचा हट्ट धरणार्या एका उच्चशिक्षित तरुणीचा आई, भाऊ व मामाने केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाल्याची भयंकर घटना कोल्हापुरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी या तिघांविरोधातही खुनाचा गुन्हा दाखल केला असून, या घटनेमुळे कोल्हापूर व पंचक्रोशीत एकच खळबळ माजली आहे. वैष्णवी लक्ष्मीकांत पवार (24) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती एका बँकेत नोकरीला होती. तिच्या लाघवी स्वभावामुळे तिचा मोठा मित्र परिवार होता. वैष्णवी कोल्हापूरमधीलच एका ढोल ताशा पथकाची सदस्याही होती.
COMMENTS