Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग पुन्हा वाहतूक कोंडीत

बोरघाट व खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगापुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील तब्बल 30 तासांहून अधिक काळ चाललेली महा वाहतूक कोंडी

माजी खा. सुजय विखे रस्त्यावर उतरतात तेव्हा…
बोरघाटाजवळील अपघाताने वाहतूक कोंडी
असंवेदनशीलता ३२ तासांची !

बोरघाट व खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील तब्बल 30 तासांहून अधिक काळ चाललेली महा वाहतूक कोंडी काही वेळासाठी निवळल्याचा दिलासा मिळाला असतानाच, शुक्रवारी पुन्हा एकदा प्रवाशांची परीक्षा सुरू झाली आहे. बोरघाट आणि खालापूर टोलनाका परिसरात वाहतूक संथ गतीने सुरू असून, वाहनांच्या रांगा किलोमीटरपर्यंत पसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
खोपोली ते अमृतांजन पुलादरम्यान सुमारे चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांची कोंडी झाली आहे. याचबरोबर पुण्याहून मुंबईकडे जाणार्‍या मार्गावरही जवळपास चार किलोमीटर लांबीची वाहतूक रांग लागल्याने द्रुतगती मार्ग पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. काही तासांपूर्वीच 32 तासांच्या दीर्घ कोंडीनंतर मार्ग मोकळा झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्‍वास घेतला होता, मात्र हा दिलासा फार काळ टिकू शकला नाही. सतत उद्भवणार्‍या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. वेळेचा अपव्यय, इंधनाची नासाडी आणि मानसिक तणाव यांचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत असून, द्रुतगती मार्गावरील वाहतूक व्यवस्थापनावर पुन्हा प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. भविष्यात अशा कोंड्यांना आळा घालण्यासाठी पर्यायी मार्गांचा प्रभावी वापर, नियोजनबद्ध वाहतूक नियंत्रण आणि तातडीच्या उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे.

COMMENTS