Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई-अहमदाबाद महामार्ग पहिल्याच पावसात खचला

मुंबई ः मान्सूनच्या पहिल्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर सर्वत्र दाणादाण उडाल्याचे दिसून येत आहे. यातच पहिल्याच मुसळधार पावसाने मुंबई- अहमदा

भर रस्त्यात डंपर चालकानं गाडीवरील तरुणीला चिरडलं
पुन्हा ‘मिशन ब्रेक द चेन’ची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता
स्वस्तातील साखरेचा मोह पडला महागात, अडीच लाख लुटले

मुंबई ः मान्सूनच्या पहिल्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर सर्वत्र दाणादाण उडाल्याचे दिसून येत आहे. यातच पहिल्याच मुसळधार पावसाने मुंबई- अहमदाबाद महामार्ग खचल्याचे समोर आले आहे. वसई हद्दीतील मालजीपाडा परिसरातील जे के टायर शोरूमजवळ पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने हा महामार्ग खचला. त्यामुळे हा महामार्ग बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवारी झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसाने मुंबई- अहमदाबाद महामार्ग खचल्याचे समोर आले आहे. महामार्ग खचल्यामुळे अनेक वाहनांचे टायर खड्ड्यांमध्ये अडकले. ज्यामुळे पुढील प्रवास खोळंबल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. महामार्ग पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. महामार्ग खचल्याने वाहतूक बंद होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

COMMENTS