बंगळुरू प्रतिनिधी- बंगळुरू(Bangalore) मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने आपल्या चार वर्षांच्या मुकबधीर मुलीला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून
बंगळुरू प्रतिनिधी- बंगळुरू(Bangalore) मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने आपल्या चार वर्षांच्या मुकबधीर मुलीला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून फेकून ठार मारले. पोलिसांनी सांगितले की आरोपी महिला ही डेंटिस्ट असून तिला वाटले की तिचे मूल, जीला बोलताही येत नाही, तिच्या करिअरमधील प्रगतीमध्ये अडथळा बनेल. दरम्यान घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी आई तिच्या मुलीसोबत बाल्कनीत फिरताना आणि नंतर तिला खाली फेकताना दिसत आहे. नंतर आरोपी आईने बाल्कनीतून उडी मारण्याचा प्रयत्न करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, परंतु शेजाऱ्यांनी तिला वाचवले. सुषमा भारद्वाज(Sushma Bhardwaj) असे आरोपी आईचे नाव आहे. याप्रकरणी सुषमाचा पती किरणने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे .
COMMENTS