Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पहाटेचा शपथविधी हा पवारांचा डबलगेम

उपमुख्यमंत्री फडणवीसांचा गौप्यस्फोट

मुंबई/प्रतिनिधी ः पहाटेचा शपथविधी होवून तब्बल साडेतीन वर्षांचा कालावधी लोटला असला तरी, पहाटेच्या शपथविधीचे कवित्व अजूनही काही संपण्याची चिन्हे ना

कॉंग्रेसची परिस्थिती सध्या बुडत्या जहाजासारखी
लातूर पोलीस दलात अत्याधुनिक 15 चारचाकी वाहने दाखल
शरद पवार यांना द्रोणाचार्य म्हणणे म्हणजे द्रोणाचाऱ्याचा अपमान…

मुंबई/प्रतिनिधी ः पहाटेचा शपथविधी होवून तब्बल साडेतीन वर्षांचा कालावधी लोटला असला तरी, पहाटेच्या शपथविधीचे कवित्व अजूनही काही संपण्याची चिन्हे नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक दावे आणि गौप्यस्फोट केलेत. पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांचा डबल गेम होता, असा मोठा दावा फडणवीसांनी केला. एवढेच नव्हे तर ’भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करण्यासाठी शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली होती. पण ’शपथविधीच्या तीन-चार दिवस आधी ऐनवेळी पवारांनी माघार घेतली, असा दावा फडणवीसांनी केला. शिवाय सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी दगाबाजी करून पाठीत खंजीर खुपसल्याचाही आरोप केलाय.

फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी असलेले नाते तोडले. त्यानंतर आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायाचा विचार करत होतो. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत येण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादीची बैठक झाली. राष्ट्रवादीकडून अजित पवार यांना पुढाकार देण्यात आले. बैठकीत ठरल्याप्रमाणे मी आणि अजित पवार  यांनी सर्व तयारी केली. मात्र शरद पवारांनी शपथविधीच्या तोंडवरच तीन चार दिवसांपूर्वी शरद पवारांनी माघार घेतली. शरद पवार यांनी  पाठीत खंजीर खुपसला का? असा प्रश्‍न  विचारला  असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी केली ती दगाबाजी होती. त्यांनी पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केले. शरद पवार आमच्यासोबत निवडून आलेले नव्हते. त्यांनी आमचा वापर करून घेतला. शरद पवारांनी रणनीती आखली आणि आमची दिशाभूल केली एकप्रकारे आमचा डबलगेम केला. मात्र आमच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम उद्धव ठाकरेंनीच केले, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. शपथविधीची तयारी झाल्यामुळे अजित पवारांना आमच्यासोबत येण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे मी आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. शरद पवारांनी पुढाकार घेतला होता. सर्व गोष्टी ठरल्या होत्या.

शपथविधीसाठी शरद पवार येतील असे अजित पवारांना वाटले होते. सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांना विश्‍वासात घेऊनच केला, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. पहाटेच्या शपथविधीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. 2019 साली महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या संघर्षाच्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा करत भल्या पहाटे राजभवानावर जाऊन  शपथ घेतली होती. परंतु अल्पवधीतच सरकार कोसळले. आजही फडणवीस यांच्या मनात ही सल कायम आहे. जाहीर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी करुन चूक केल्याचे बोलून दाखवले होते.

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी नवे पुरावे- जवळपास तीन वर्षांपूर्वी अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणात नवे पुरावे समोर आल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पूर्वी उपलब्ध माहिती ही केवळ अफवांवर आधारित होती, त्यानंतर काही लोकांनी दावा केला की त्यांच्याकडे या प्रकरणासंबंधीचे पुरेसे पुरावे आहेत. त्यानंतर या लोकांशी संपर्क साधून पुरावे पोलिसांकडे देण्यास सांगण्यात आले. सध्या अधिकार्‍यांनी दिलेल्या पुराव्यांची विश्‍वासार्हता पडताळण्याचे काम सुरू असून अद्याप तपास सुरू असल्याचेही फडणवीस म्हणाले.

COMMENTS