पुणे/प्रतिनिधी ः एसटी महामंडळाचे स्मार्ट कार्ड उपलब्ध नसल्याने राज्यातील हजारो वाहनधारकांना महिनोंमहिने प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र, आता ही
पुणे/प्रतिनिधी ः एसटी महामंडळाचे स्मार्ट कार्ड उपलब्ध नसल्याने राज्यातील हजारो वाहनधारकांना महिनोंमहिने प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र, आता ही प्रतीक्षा संपली आहे. कारण, परिवहन विभाग आता आधुनिक मशिनचा वापर करून स्मार्ट कार्ड प्रिंटिंगचा वेग वाढविणार आहे. त्यामुळे दिवसाला 45 हजार स्मार्ट कार्डच्या मदतीने वाहन परवाना व आरसी (वाहन नोंदणी प्रमाणपत्र) तयार केले जाणार आहे.
तसेच नव्या स्मार्ट कार्ड रूपदेखील बदलणार आहे. पुर्वीच्या तुलनेने अधिक चांगल्या दर्जाचे व कमी किमतीचे हे स्मार्ट कार्ड उपलब्ध होईल. 1 जुलैपासून नवे स्मार्ट कार्ड वाहनधारकांना उपलब्ध होणार आहे.स्मार्ट कार्डच्या पुरवठ्याबाबत हैदराबाद येथील रोझमार्टा या कंपनीशी राज्याच्या परिवहन विभागाचा असलेला करार संपुष्टात आला आहे. आता कर्नाटक येथील मणिपाल टेक्नॉलॉजी कंपनीला स्मार्ट कार्डचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यानुसार रोज किमान 45 हजार स्मार्ट कार्ड परिवहन विभागाला मिळतील. तसेच यंदा पहिल्यांदाच परिवहन विभागाने स्मार्ट कार्डवर वाहनधारकांचे नाव, पत्ता प्रिंट करण्याचे अधिकार स्थानिक आरटीओ कार्यालयांकडून काढून घेतले आहेत. आता हे अधिकार राज्यातील केवळ तीनच आरटीओ कार्यालयाला असतील. यात पुणे, मुंबई व नागपूर यांचा समावेश असेल.
COMMENTS