Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाबळेश्‍वर तालुक्यातील दळण-वळण राडारोड्यातून होणार

महाबळेश्‍वर : पारच्या रानातील रस्त्याची सध्याची स्थीती. (छाया : अनिल वीर) सातारा / प्रतिनिधी : महाबळेश्‍वर तालुका हा पावसाचा आगार आहे. त्यामुळे रस

सांगली बँकेस 18 जागांसाठी 85.31 टक्के मतदान
परतीच्या पावसाने हेळगावसह कालगाव परिसरास झोडपले
एफआरपी द्या अन्यथा वसुली थांबवा : पाटील

सातारा / प्रतिनिधी : महाबळेश्‍वर तालुका हा पावसाचा आगार आहे. त्यामुळे रस्त्यांच्या नादुरुस्तीचे कामे न झाल्याने कोयना विभागातील दळणवळण राडारोड्यातून होणार आहे.
22 जुलै 2021 रोजी झालेल्या ढग फुटी पावसामुळे कोयना विभागाला जोडणारा वाडा ते दुधगाव हा मुख्य रस्ता असून परिसरात सुमारे 25 पेक्षा अधिकची गावे वसलेली आहेत. वाडा आणि पारच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात दरडी कोसळून रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. गतवर्षी तर महाप्रलयात तर इतका राडारोडा निर्माण झाल्याने रस्ताच गायब झाला होता. कसातरी शोध घेतलेला रस्ता पुर्णतः दुरुस्त केला गेला नाही. दुसरा पावसाळा आता तोंडावर आला आहे. तरीही अजून कामे पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात या विभागातील जनतेचे खूप मोठ्या प्रमाणावर अतोनात हाल होणार आहेत. आ. मकरंद पाटील यांनी जनतेला शब्द दिला होता की, पावसाळ्यापूर्वी रस्त्याची कामे पूर्ण करू. पण, पावसाळा आला तरी काम धीम्या गतीने चालू आहे. पर्यायी मार्ग काढलेला आहे. पण त्याचेही काम खूपच हळूहळू चालू आहे. सध्या पावसाळी हंगाम चालू आहे. पाऊस कधीही निरंतर चालू होऊ शकतो. आणि तालुक्यातील पाऊस हा मोठा आणि उभा असल्याने इतर कामे आपसुक बंद होतात. अशा स्थितीत रस्ता दुरुस्तीचे काम कोण करणार? हाही प्रश्‍न ऐरणीवर आहेच. आता नाही तर मग या जनतेने काय करायचे? तेव्हा संबंधितांनी त्वरित लक्ष्य देऊन काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे संबधीत अधिकार्‍यांना सांगून प्रत्यक्ष कारवाई केली तरच जनतेचे होणारे हाल कमी होतील. शिवाय, गतवर्षीप्रणे पूर्णतः दळणवळणच ठप्प होण्याचा धोका संभवतो.

COMMENTS