मुख्यमंत्रिपदाची हाव नसल्याचा मेसेज

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्रिपदाची हाव नसल्याचा मेसेज

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन, अशी घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेची मोठी खिल्ली उडवण्यात आली होती. सत्तेची हाव असल्याचा तो मेसेज

आजचे राशीचक्र रविवार, ०७ नोव्हेम्बर २०२१ अवश्य पहा (Video)
मेंढेगिरी समिती नगर-नाशिक शेतकर्‍यांचा बळी घेणार का?
सांगली – पुरग्रस्तांना मदत न मिळाल्याने चक्काजाम आंदोलन

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन, अशी घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेची मोठी खिल्ली उडवण्यात आली होती. सत्तेची हाव असल्याचा तो मेसेज होता. मात्र यावेळेस सत्तेत सहभागी न होता, मुख्यमंत्री न होता, आपल्याला सत्तेची हाव नसल्याचा एकप्रकारे मेसेजच देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार असले तरी विधानसभेत 106 जागा असणार्‍या भाजपला सत्तेत महत्त्वाचा वाटा मिळणार, हे स्पष्टच आहे. अर्थमंत्रिपदासह अनेक महत्त्वाची खाती भाजप आपल्याकडे ठेवण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने मुख्यमंत्रिपदाचा मोह टाळला असला तरी इतर महत्त्वाची खाती असल्याने राज्याच्या सत्तेची चांगलीच ताकद भाजपला मिळणार आहे.

COMMENTS