Homeताज्या बातम्यादेश

राजधानीसह अनेक शहरांत पारा घसरला

नवी दिल्ली ः देशातील अनेक राज्यांमध्ये तापमानात हळूहळू घट होत आहे. हवेत हलकीशी थंडी जाणवत आहे. तर काही राज्यांमध्ये अजूनही पावसाची स्थिती कायम आह

राज्यात धावणार शंभर इॅलेक्ट्रिक बस
वनविभागाने बिबट्या पकडण्यासाठी पिंजऱ्याची संख्या वाढवावी
LokNews24 l मुरबाड पंचायत समिती सभापती पदी दिपक पवार यांची निवड

नवी दिल्ली ः देशातील अनेक राज्यांमध्ये तापमानात हळूहळू घट होत आहे. हवेत हलकीशी थंडी जाणवत आहे. तर काही राज्यांमध्ये अजूनही पावसाची स्थिती कायम आहे. मात्र महाराष्ट्राकडे पावसाने पाठ फिरवली आहे. राजस्थानच्या चुरू आणि हरियाणाच्या हिस्सारमध्ये किमान तापमान 10 अंशांच्या खाली आला आहे. त्यामुळे नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे.
दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर येथे या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. पारा 10.9 अंशांवर घसरला आहे. तसेच उत्तर भारतातील मैदानी भागात थंड वारे वाहत आहेत. या भागात पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याने, येथे प्रदूषण कमी होण्याची शक्यता कमी आहे.  स्कायमेट हवामान अहवालानुसार, पुढील 24 तासांत तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्‍चिम बंगालमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  याशिवाय अंदमान आणि निकोबार बेटांवरही हलका पाऊस पडू शकतो. हवामान विभागाने, केरळ, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड आणि आसाममध्येही हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. गुरुवारी दिल्लीतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब राहिली आहे.

COMMENTS