बीड प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या 17 ऑगस्ट रोजी बीड येथे होणार्या सभेनंतर महाराष्ट्राच्या
बीड प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या 17 ऑगस्ट रोजी बीड येथे होणार्या सभेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार आहे. पवार साहेबांनी कायम युवकांना संधी देण्याचे राजकारण केले आहे. असे प्रतिपादन आ.संदीप क्षीरसागर यांनी अंबाजोगाई येथील स्व.विलासराव देशमुख न.प. सभागृह येथे पूर्वतयारी बैठकीत केले.
मंगळवार (दि.8) रोजी सायंकाळी बीड येथील राष्ट्रवादी भवन याठिकाणी बीड शहर आणि बहीरवाडी पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक झाली. यानंतर बुधवार (दि.9) रोजी अंबाजोगाई येथील स्व. विलासराव देशमुख न.प. सभागृह याठिकाणी केज-अंबाजोगाई विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांची आ.क्षीरसागर यांनी बैठक घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांची बीड येथे सभा नियोजीत आहे. या सभेची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे देण्यात आली असल्याने ते जिल्हाभरात ठिकठिकाणी पूर्वतयारी बैठका घेऊन नियोजन करत आहेत. अंबाजोगाई येथे झालेल्या पूर्वतयारी बैठकीला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे, बीड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सय्यद सलीम आदींची प्रमुख उपस्थिती होती. तसेच केज-अंबाजोगाई विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS