मॅच आधीच कर्णधार बाबर आझम बॅकफूटवर

Homeताज्या बातम्याक्रीडा

मॅच आधीच कर्णधार बाबर आझम बॅकफूटवर

दुसरा वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीम ज्युनियरलाही दुखापत झाली आहे

आशिया कप २०२२ स्पर्धेत भारताची सलामी लढत दुसर्‍या दिवशी म्हणजे २८ ऑगस्टला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. दोन्ही संघ आणि क्रिकेटप्रेमी देखील या सामन्यास

शार्दुल ठाकूर लवकरच अडकणार विवाहबंधनात
चिनी तैपईला नमवून व्हिएतनामचा फिफा विश्‍वचषक स्पर्धेत प्रवेश
विश्व विजयापासून भारत दोन पावले दूर

आशिया कप २०२२ स्पर्धेत भारताची सलामी लढत दुसर्‍या दिवशी म्हणजे २८ ऑगस्टला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. दोन्ही संघ आणि क्रिकेटप्रेमी देखील या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. गत वर्षी वर्ल्ड कप टी-२० स्पर्धेत पाकिस्तानने केलेल्या पराभवाचा बदला घेण्यास रोहित शर्मा आणि पलटण उत्सुक असतील. पाकिस्तान देखील भारताविरुद्ध कडवी झुंज देण्याचा प्रयत्नांत आहे पण पाकिस्तान संघासमोर अडचणी उभ्या राहत आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा दुसरा गोलंदाजही जखमी झाला आहे. त्याला दवाखान्यात नेण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीनंतर आता दुसरा वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीम ज्युनियरलाही दुखापत झाली आहे. शाहीन आधीच आशिया कपमधून बाहेर आहे. मात्र वसीमचा संघात समावेश करण्यात आला होता; पण सरावादरम्यान त्याला दुखापत झाली.

COMMENTS