अनुष्का पाटोळे प्रकरणात सखोल तपासाची मागणीगेवराई । प्रतिनिधीलातूर जिल्ह्यातील अनुष्का पाटोळे या तरुणीचा विद्यालयात संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर

अनुष्का पाटोळे प्रकरणात सखोल तपासाची मागणी
गेवराई । प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील अनुष्का पाटोळे या तरुणीचा विद्यालयात संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात आणि समाजात संतापाची लाट पसरली आहे. या घटनेमुळे पीडित कुटुंब आणि स्थानिक नागरिकांमध्ये पोलीस आणि विद्यालय प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यामुळे गेवराई तालुक्यातील सकल मातंग समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात प्रकरणाची उखऊ किंवा डखढ मार्फत निष्पक्ष व सखोल चौकशी, दोषींवर कायदेशीर कारवाई, पीडित कुटुंबाला प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य व संरक्षण, पीडित कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत समावेश, तसेच तात्काळ 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर सह्या करणार्या प्रमुख पदाधिकार्यांमध्ये लहुजी साळवे, दादाराव रोकडे, डॉ. अण्णाभाऊ साठे, बाबासाहेब कांबळे, रवींद्र पाटोळे, भगवान आडागळे, बाळासाहेब साबळे, किशोर भोले, किशोर कांडेकर, संजय सुतार, जालिंदर कासार, बाबुराव कांबळे, तीर्थराज धुरंधरे यांचा समावेश आहे. सकल मातंग समाजाच्या वतीने निवेदनात म्हटले आहे की, प्रकरणात संशयास्पद घटक असल्यामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि सत्य समोर आणण्यासाठी राज्य सरकारने त्वरित योग्य ती कारवाई करावी.

COMMENTS