नागवडेची बाजार भावाची घोषणा म्हणजे मृगजळ  : केशवराव मगर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागवडेची बाजार भावाची घोषणा म्हणजे मृगजळ : केशवराव मगर

श्रीगोंदे : नागवडे कारखान्याने दोन हजार सहाशे रुपये भाव घोषित केल्याबद्दल चेअरमनचे अभिनंदन परंतु मागील वर्षी 2 हजार 661 रुपये घोषित करून शासनाचा आदेश

श्री कालभैरवनाथांच्या यात्रेनिमित्त बहिरवाडीत पारायण सोहळा
दुधाला 40 रुपये दराच्या मागणीसाठी अकोलेत निदर्शने  
अण्णा हजारेंनी विद्यार्थ्यांचा केलेला सन्मान ऊर्जादायी ः विद्या पवळे

श्रीगोंदे : नागवडे कारखान्याने दोन हजार सहाशे रुपये भाव घोषित केल्याबद्दल चेअरमनचे अभिनंदन परंतु मागील वर्षी 2 हजार 661 रुपये घोषित करून शासनाचा आदेश नसताना 217 रु. प्रती टनप्रमाणे 15 कोटी 25 लाख रुपयांना सभासदांना कमी भाव दिला मग आता सभासदांची दिशाभूल करून बाजारभावाची घोषणा मृगजळ ठरू नये अशी अपेक्षा  सहकार महर्षी नागडे कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन केशव मगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.     सध्या कारखान्याची सरासरी गाळप क्षमता 5000 मेट्रिक टन असताना नागवडे कारखाना सरासरी 5000 मेट्रिक टनाप्रमाणेच चालतो परंतु असे अनेक कारखाने आहेत ज्यांची 3500 मेट्रिक टनाची क्षमता असताना 4500 मेट्रिक टनाने गाळप करतात.नागवडे कारखान्याची क्षमता जास्त आहे म्हणून किमान सहा हजार मेट्रिक टनाचे रोज गाळप होणे अपेक्षित  असताना चेअरमन राजेंद्र नागवडे यांचे कारखान्याकडे दुर्लक्ष असल्यानेच  होत नाही. .कारखाना सुरू झाल्यानंतर सव्वीस दिवसांनी सहवीज निर्मिती चालू झाली कारखान्याची सह वीज निर्मिती 26 मेगावॅट आहे कारखान्याला दहा मेगावॅट वीज लागते व उर्वरित वीज वितरण ला विक्री होऊ शकते परंतु नागवडे कारखाना फक्त पन्नास टक्केच वीज निर्मिती करतो मग आपण सांगितल्याप्रमाणे सहवीज निर्मितीतून सात कोटीचा नफा कसा होणार? असा सवालही मगर यांनी केला आहे. तसेच कारखाना या वर्षी इथेनॉल उत्पादन चालू करणार अशी घोषणा केली,परंतु    साधी डिसलरी सुद्धा वारंवार घोषणा करून चालू करता आली नाही हे वास्तव आहे.      मागील वर्षीच्या एफआरपी प्रमाणे उर्वरित 217 रुपये टनाप्रमाणे सर्व शेतकरी सभासदांच्या खात्यावर आधी वर्ग केले तरच सभासद आपल्या 2600 रुपयाच्या घोषणेला खरे धरतील अन्यथा ही मागील सारखीच पोकळ घोषणा ठरुणार अशी शंका मगर यांनी व्यक्त केला आहे.तसेच  कारखाना 86032 ऊसाचे गाळप करत असताना सुद्धा आपली सरासरी रिकव्हरी 9.60 इतकी कमी का येते असाही सवाल मगर यांनी उपस्थित केला आहे.त्याचबरोबर कार्यक्षेत्रा बाहेरील आ पंचवीस ते तीस टक्के ऊस सभासदांच्यावर अन्याय करून  आणण्याचे काम करताय ते बंद करून सभासदांना प्राधान्य द्यावे. व येत्या पंधरा दिवसात मागील एफआरपी नुसार 217 रुपये प्रमाणे पेमेंट द्यावे अन्यथा शेतकरी उपोषण करतील असे मगर म्हणाले.


नैतिकता स्वीकारून राजेंद्र नागवडे यांनी चेअरमन पदाचा राजीनामा द्यावा

तीन महिन्यापूर्वी राजेंद्र नागवडे यांनी अशी घोषणा केली होती की जर कराडला माझा कारखाना किंवा कारखान्याशी माझा किंवा माझ्या कुटुंबाचा काही संबंध असल्यास मी चेअरमन पदाचा राजीनामा देईन चार-पाच दिवसापूर्वी त्यांच्या घरासमोर आंदोलन करून हे सिद्ध झाले की त्यांचा खाजगी कारखान्याशी संबंध आहे ही नैतिकता स्वीकारून राजेंद्र नागवडे यांनी त्वरित चेअरमन पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मगर यांनी केली आहे.*

COMMENTS