Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यभर मराठा आंदोलनाची धग कायम

छ.संभाजीनगरमध्ये तरूणाने पेटवली स्वतःचीच दुचाकी

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी ः मराठा आंदोलकांवर लाठीमार केल्याची धग सोमवारी देखील कायम बघायला मिळाली. मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याचे पडसाद सोमवारी देख

 नैसर्गिक फुलापेक्षा चायनीज फुलाला मार्केटमध्ये अधिक मागणी
Aurangabad : संभाजीनगर लिहिण्याचा अधिकार कोणी दिला- खा.इम्तियाज जलील (Video)
सार्वजनिक बांधकाम विभाग नवनिर्मिती अणि सृजनशीलतेचे दुसरे नाव

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी ः मराठा आंदोलकांवर लाठीमार केल्याची धग सोमवारी देखील कायम बघायला मिळाली. मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याचे पडसाद सोमवारी देखील राज्यभर बघायला मिळाले. औरंगाबाद, हिंगोली, सातारा, नांदेड या जिल्ह्यात सोमवारी सकल मराठा समाजाकडून बंद पाळण्यात आला. तर, बारामती, निफाड येथेही बंदमुळे बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

मराठा समाजाला आरक्षण द्यावे म्हणून राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर सिल्लोड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. दरम्यान काही आक्रमक आंदोलनकर्त्यांनी स्वतःची दुचाकी जाळून राज्य सरकारचा निषेध नोंदविला. जालना जिल्ह्यात झालेल्या मराठा समाजावरील लाठीचार्जनंतर राज्यातील अनेक जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी मोर्चे आणि निदर्शने करण्यात आली. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मराठा मोर्चा समन्वय समितीचे सर्व मराठा बांधव व सत्ताधारी विरोधी पक्षात असला असलेले मराठा समाजाचे नेते या बंदसाठी मराठा मोर्चा पदाधिकार्‍यांसमवेत सहभागी झालेले दिसून आले. चौकात सर्व मराठा समाज बांधव सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे यांनी समाजाला आरक्षणाची गरज का आहे, याबाबत सखोल मार्गदर्शन केले. यानंतर शहरवासीयांनी मराठा समाज बांधवांच्या आव्हानाला प्रतिसाद देत संपूर्ण शहर बंद ठेवल्याबद्दल सर्व व्यापारी वर्गाचे आभार व्यक्त केले. शिवाय या बंद दरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही याची ग्वाही दिली. या सभेनंतर सर्व मराठा समाज बांधव शहरातील मुख्य रस्त्याने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक, शहीद भगतसिंग चौक, भगवान महावीर चौक, प्रियदर्शनी चौक मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले. या ठिकाणी समाज बांधवांच्या वतीने प्रमुख पदाधिकार्‍यांनी उपविभागीय अधिकारी यांना मराठा समाजास आरक्षण मिळावे अशा आशयाचे निवेदन सादर केले. सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, विरोधातील शिवसेना आणि शरद पवार गट व इतर विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान गोळेगाव येथील मराठा मोर्चा समन्वय समितीचे कार्यकर्ते असलेले अनिल पाटील बनकर यांनी शहरातील बाबासाहेब आंबेडकर चौकात आपल्या स्वतःच्या मालकीची दुचाकी पेटवून दिली. तसेच महाराष्ट्र सरकारचा निषेध करीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात घोषणा दिल्या.

राज्यभर आंदोलन सुरूच –  मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. मात्र आम्हाला खात्री आहे की, सरकारचे शिष्टमंडळ हे जीआर घेऊनच आमच्याकडे येईल. सरकारकडे अजून 1 दिवस आहे. उद्या निर्णय झाला नाही तर आम्ही सर्वजण बसून आंदोलनाची पुढील दिशा ठरवू. अन्यथा पाणी फुटेल, असा इशारा मनोज जरांडे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

COMMENTS