Homeताज्या बातम्यासंपादकीय

शेतकऱ्याला मज्जाव करणारा माॅल माजला ?

देशातल्या फाइव स्टार किंवा सेवन स्टार हॉटेलमध्ये धोती किंवा पायजमा असा पेहराव करून प्रवेशाला मज्जाव करण्याच्या अनेक घटना, काही वर्षांपूर्वी घडून

संविधानिक चौकटीच्या उद्ध्वस्तीचा मार्ग ! 
कावळ्यांची उपासमार होऊ नये म्हणून?
मुंडें’चे संस्कार पाहणारे जयंत पाटील यांचे वास्तव काय ?

देशातल्या फाइव स्टार किंवा सेवन स्टार हॉटेलमध्ये धोती किंवा पायजमा असा पेहराव करून प्रवेशाला मज्जाव करण्याच्या अनेक घटना, काही वर्षांपूर्वी घडून गेल्या आहेत. परंतु, आता जागतिकीकरणाच्या काळामध्ये प्रत्येक महानगरात आधुनिक मॉल संस्कृती उभी राहिली आहे.  अशा माॅल संस्कृतीतच बेंगलोरच्या जीटी वर्ड या मॉलमध्ये सेप्तूजेनेरियन फकीराप्पा या शेतकऱ्याला त्याच्या पत्नी आणि एमबीए शिकत असलेल्या मुलासह मॉलमध्ये प्रवेश करताना मज्जाव करण्यात आला. शेतकऱ्यांने धोतीचा पेहराव केला होता, त्यामुळे त्यांना प्रवेश नाकारण्याची भूमिका घेतली. परंतु, याचे पडसाद कर्नाटक विधानसभेत उमटले. सत्ताधारी पक्षाचे विधानसभा अध्यक्ष, विविध खात्याचे मंत्री यांनी तात्काळ या मॉल वर कारवाई करण्याचे आदेश दिले. अधिकाऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीत  माॅलवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याचा परिणाम जी टी वर्ड मॉल सात दिवसासाठी बंद करण्यात आला. कर्नाटकचे सामाजिक न्याय मंत्री एस. सी. महादेवाप्पा यांनी म्हटल्याप्रमाणे, व्यक्तीच्या प्रतिष्ठा आणि स्वाभिमानाला परिस्थितीत ठेच पोहोचवता येणार नाही. कारण, संविधानाने हा हक्क त्याला दिलेला आहे. त्यामुळे मॉल वर कारवाई झालीच पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली. मॉल विरोधात कारवाई न झाल्यास, शेतकऱ्यांचे आंदोलन त्या ठिकाणी करण्यात येईल, अशी भूमिका ही काही आमदारांनी घेतल्यानंतर मॉल बंद करण्यात आला.

आधुनिक काळात झगमगाट उभा राहत असताना, त्या झगमगाटात देशाचा पारंपारिक उत्पादक असलेला शेतकरीच प्रवेशापासून वंचित ठेवला जात असेल, तर, अशा मॉल संस्कृतीला आता सरळ करण्याची वेळ आली आहे. या मॉल संस्कृतींनी कायद्याचे पालन करण्याचे ही जवळपास यापूर्वीच नाकारलेले आहे. मॉलमध्ये असणारे अनेक थिएटर्स मध्ये बाहेरून अन्नपदार्थ किंवा पाण्याची बॉटल आणण्यास मनाई आहे. त्या ठिकाणी साधी पाण्याची बॉटल शंभर रुपयाच्या किमतीला मिळते. बाजारपेठेत १५ रुपयाला उपलब्ध असलेली पाण्याची बॉटल, सक्तीने, शंभर रुपयाला विकत घ्यायला भाग पडणाऱ्या मॉल संस्कृती विरोधात प्रत्यक्ष कायदा झाला आणि त्या विरोधात नागरिकांचे हक्क शाबूत ठेवण्याची भूमिका घेण्यात आली. परंतु, अद्यापही मॉल संस्कृतीने त्यावर अंमलबजावणी केली नाही. हे महाराष्ट्रात देखील घडले आहे. भांडवली शक्तीने नागरिकांच्या अधिकारावर आणि कायद्याच्या कसोट्यांवरही आपली पकड घेतल्याचे, या उदाहरणांवरून दिसते. या विरोधात कारवाई न झाल्यास ही संस्कृती बळावली जाऊन, भारतीय लोकांच्या अधिकार आणि सन्मानावर निश्चितपणे गदा येईल. त्यामुळे वेळीच अशा भौतिकतेने गंजलेल्या संस्कृतींचा समाचार घ्यायला हवा. कर्नाटकातील फकीराप्पा हे शेतकरी आपल्या मुलांना शिक्षित करीत आहेत. मुलांच्या आग्रहास्तव त्यांनी त्यांच्या सोबत येऊन चित्रपट बघावा, याकरिता मुलाच्या आग्रहास्तव ते पत्नीसह मॉलमध्ये जाताना घडणारा हा घटनाक्रम, त्या संपूर्ण कुटुंबाच्या मानसिकतेवरही परिणाम करणारा तर आहेच; परंतु, घटनेने दिलेल्या त्यांच्या प्रतिष्ठा आणि सन्मानाची ही मोडतोड आहे. किंबहुना, ते अधिकार मॉल सारखी संस्कृती कशी नाकारू शकते, यावर देशात आता गदारोळ निर्माण होऊ शकतो. परंतु, मूलभूत चर्चा या विषयावर करणे मात्र गरजेचे झाले आहे. पेहराव ही संस्कृती असते. लोकशाही देशात एखाद्या खाजगी माॅल”ने असा प्रकार करणे म्हणजे सत्ताधारी असल्याचा आव निर्माण करणेच होय. अशा स्व अधिकार निर्मिणाऱ्या या माॅल संस्कृतीला त्यांची पात्रता दाखवून दिली पाहिजे!

COMMENTS