छत्रपती संभाजी नगरचे मुख्य रस्ते बनली सेल्फी पॉईंट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 छत्रपती संभाजी नगरचे मुख्य रस्ते बनली सेल्फी पॉईंट

  छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी - जी ट्वेंटी परिषदेच्या निमित्ताने शहरात सौंदर्यकरणाची प्रचंड कामे करण्यात आली आहेत. प्रमुख रस्त्यावर आकर्षक रोष

शरद साखर कारखान्यात मंत्री भुमरेंचा आर्थिक गैरव्यवहार : अंबादास दानवे
कडक उन्हाळ्यातही शहर वासियांना चार दिवसांनतर पाणी
दामिनी पथकाने दिली असभ्य वर्तन करणाऱ्या मुला-मुलींना समज

  छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी – जी ट्वेंटी परिषदेच्या निमित्ताने शहरात सौंदर्यकरणाची प्रचंड कामे करण्यात आली आहेत. प्रमुख रस्त्यावर आकर्षक रोषणाई पाण्याचे कारंजे सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले. दररोज सायंकाळी सहा ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत नागरिक सहकुटुंब सेल्फी काढण्यासाठी सुभेदारी गेस्ट हाऊस जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान जुबली पार्क सीडको इत्यादी भागात गर्दी करत आहेत. या गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांना दखल घ्यावी लागत आहे. जी ट्वेंटी परिषदेच्या निमित्ताने शहराला बोर्डिंगची मोठी संधी चालून आली राज्य शासनाने महापालिकेला 50 कोटीची मदत केली याशिवाय जिल्हा प्रशासन पर्यटन विभाग महावितरण इतर शासकीय कार्यालयांनी ही जवळपास 50 कोटी रुपये खर्च केले. अवघ्या शंभर कोटी रुपयांमध्ये शहरच्या सुंदरतेत भर पडली असुन शहराचे बदलले हे रूप नागरिकांना प्रचंड आकर्षण वाटत आहे. नागरिक सहकुटुंब सहपरिवार  मनोहरी दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी येत आहेत. लखलखीत झाडाजवळ उभे राहून सेल्फी घेण्याचा मोह नागरिकांना आवरत नाही आहे. यावेळी नागरिक म्हणाले की, आपले शहरात सुंदर झालेला आहे. याचे जतन केले गेले पाहिजे. कधी नव्हे असे शहर सुंदर दिसत आहे. त्याची काळजी आपण सर्वांनी घ्यायला हवी. जी ट्वेंटी परिषदेनिमित्त आपल्याला एक संधी मिळाली आहे. त्यामुळे जे प्रशासनाने काम केले आहे त्याचं जतन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. 

COMMENTS