अंबाजोगाई प्रतिनिधी- निजामाच्या राजवटीतून 17 सप्टेंबर 1948 या दिवशी हैदराबाद संस्थानातून मराठवाडा मुक्त झाला.17 सप्टेंबर 2023 ला मराठवाडा मुक्ती
अंबाजोगाई प्रतिनिधी- निजामाच्या राजवटीतून 17 सप्टेंबर 1948 या दिवशी हैदराबाद संस्थानातून मराठवाडा मुक्त झाला.17 सप्टेंबर 2023 ला मराठवाडा मुक्तीसंग्रामास 75 वर्ष पूर्ण होत असून संपूर्ण राज्यात मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करण्यात येत आहे. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त होणारा मुख्य शासकीय कार्यक्रम हा अंबाजोगाई या ऐतिहासिक शहरात घेण्यात यावा. तसेच या मुक्तीसंग्रामात हौतात्म्य पत्करलेल्या सर्व हुतात्म्यांच्या स्मरणार्थ त्यांचे स्मारक उभारण्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा अशी मागणी वैधानिक विकास मंडळाचे माजी सदस्य तथा अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकीशोर मोदी यांनी शासनाकडे केली आहे.
मराठवाडा मुक्तीसंग्राम साठीचा लढा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली येथूनच सुरू झाला. नंतर गोविंद भाई श्रॉफ ,बाबासाहेब परांजपे, देवीसिंह चौहान, रविणारायन रेड्डी, दिगंबर बिंदू यांनी साथ दिली.तसेच त्यांना संभाजी नगर, परभणी, लातूर, उस्मानाबाद, नांदेड येथील सैनानींनी देखील स्वामी रामानंद यांची साथ केली . अंबाजोगाई शहरातील स्वातंत्र सेनानीनी अंबाजोगाई शहरातूनच मराठवाडा मुक्ती संग्रामच्या लढ्याची सुरुवात केल्याने या शहराची एक वेगळी व ऐतिहासिक ओळख निर्माण झाली आहे. या सर्व स्वातंत्र सेनानीच्या स्मरणार्थ मुक्तीसंग्रामाचे स्मारक बनविण्यासाठी शासनाने 100 कोटींचा निधी उपलब्ध करून घ्यावा .त्याचबरोबर मागील अनेक दिवसांपासून मराठीचे भाषेचे विद्यापिठ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचे उपकेंद्र अंबाजोगाई शहरात करण्याच्या मागणी सोबतच मागच्या पंचवीस ते तीस वर्षांपासूनची अंबाजोगाई जिल्हा निर्मितीसाठीची मागणीही पूर्ण करावी अशी मागणी राजकिशोर मोदी यांच्या वतीने करण्यात येत आहे. अंबाजोगाई शहर हे शैक्षणिक व सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाते .येथे मराठीचे आद्यकवी मुकुंदराज स्वामी यांची समाधी शहरालगत असलेल्या डोंगरदर्यात आहे. प्राचीन अशा हत्तीलेण्या, बुट्टेनाथ व नागनाथ शिवालय व अप्रतिम अशा नैसर्गिक सौंदर्याची देणगी व येथीलच डोंगरदर्या पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे मोठ्या संख्येने येत असतात. तसेच दासोपंतांची समाधी , साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेले श्री योगेश्वरी देवीचे पुरातन मंदिर त्याचबरोबर आजही संत दासोपंत यांची हस्तलिखित पासोडी च्या रूपाने एक प्राचीन असा अनमोल ठेवा जतन आहे . तसेच आशिया खंडातील एकमेव असे ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय याचबरोबर विविध शैक्षणिक संस्थाची मांदियाळी अंबाजोगाई शहरात आढळून येते. या सर्व बाबींवरून अंबाजोगाई शहर हे शैक्षणिक व सांस्कृतिक शहर म्हणून सर्वदूर परिचित आहे. या वं इतर अनेक विषयांवरुन अंबाजोगाई जिल्ह्याची मागणी देखील गेली कित्येक वर्षांपासून होत आहे. अंबाजोगाई शहराच्या अन्य वैशिष्ठ्यपूर्ण बाबींमध्ये अंबाजोगाई शहर हे मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे प्रमुख केंद्र होते.शेकडो स्वातंत्रसेनानीनी यात हौतात्म्य पत्करले आहे.1935 साली स्वामी रामानंद तीर्थ यांनी श्री योगेश्वरी शिक्षण ससंस्थेची निर्मिती केली आहे. त्याचबरोबर भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे शैक्षणिक संकुल ,इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, शासकीय कृषी महाविद्यालयासोबतच , शासकीय डीएड व बीएड महाविद्यालय, तसेच श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे न्यू व्हिजन पब्लिक सी बी एस ई स्कुल यांसह अनेक शैक्षणिक संस्थांचा समावेश अंबाजोगाई शहरात असल्याने येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्यात यावे ही मागणी देखील अंबाजोगाई करांच्या वतीने अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. यासाठी लागणारी शेकडो एकर शासकीय जमीन देखील उपलब्ध असून याचा वापर शासनाकडून करण्यात यावा. अंबाजोगाई शहरासाठी औद्योगिक विकास क्षेत्र म्हणून मान्यता आहे .येथेच एखादा मोठा शासकीय प्रकल्प उभा करून येथील तरुण युवकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचे राजकिशोर मोदी सांगितले आहे. शहरास सांस्कृतिक , सामाजिक , व चळवळीचा वारसा लाभलेला आहे .अंबाजोगाई शहरातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात भाग घेऊन हौतात्म्य पत्करले आहे . या सर्वांच्या त्यागाची आठवण व स्मरण येणार्या पिठीला असावे व आपल्या देशाचा ऐतिहासिक ठेवा जतन व्हावा यासाठी शासनाने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्ताने मुख्य शासकीय सोहळा अंबाजोगाई या ऐतिहासिक शहरात घेऊन हुतात्म्यांना न्याय द्यावा व शहिद हुतात्म्यांच्या स्मारकासाठी 100 कोटींचा निधी उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी समस्त अंबाजोगाई करांच्या वतीने राजकिशोर मोदी यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे.
COMMENTS