Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाळा ,शासन आणि संस्था यामधील दुवा म्हणजे मुख्य लिपिक-प्रा.चंद्रकांत मुळे

मुख्य लिपिक रवींद्र वांगीकर यांचा सेवा गौरव सोहळा संपन्न

माजलगाव प्रतिनिधी - श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्य लिपिक रवींद्र वांगीकर यांच्या सेवा गौरव समारंभ प्रसंगी भारतीय शिक्षण प्रसारक संस्

शेतकऱ्यांना तत्काळ अनुदान देण्यात येईल : उपमुख्यमंत्री अजित पवार
वाहतूक पोलिसांची अवजड वाहन चालकाला मारहाण.
राजकारणाचा उकीरडा

माजलगाव प्रतिनिधी – श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्य लिपिक रवींद्र वांगीकर यांच्या सेवा गौरव समारंभ प्रसंगी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रा चंद्रकांत मुळे बोलत होते यावेळी त्यांनी सांगितले की, सदैव कार्य तत्पर व कार्यकुशलता ठेऊन आपल्या कामाला प्राधान्य देऊन संस्थेत 27 वर्षाच्या प्रदीर्घ सेवा देऊन सेवा निवृत्त होत असलेल्या रवींद्र वांगीकर यांचा आदर्श कार्यालयीन नवीन कर्मचारी यांनी आदर्श घ्यावा , संस्था, शासन आणि मुख्याध्यापक यांच्या मधील दुवा म्हणजे मुख्य लिपिक असतो.
या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अमरनाथ खुर्पे, प्रमुख अतिथि प्रा चंद्रकांत मुळे, तर व्यासपीठावर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश दुगड, बाबुराव आडे गुरुजी, विद्यासभा उपाध्यक्ष उमेश जगताप, स्थानिक संस्था सभासद प्रशांत भानप, सत्कारमुर्ती रवींद्र वांगीकर त्यांच्या सविद्य पत्नी सौ संगीता वांगीकर इत्यादी उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीने संपुर्ण आहेर देऊन श्री व सौ संगीता रवींद्र वांगीकर यांचा गौरव व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तर शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने भेट वस्तु देऊन शाळेचे मुख्याध्यापक अनंतराम कोपले, उपमुख्याध्यापक विठ्ठल काळे, पर्यवेक्षक रवींद्र खोडवे, सदाशिव ढगे, सुर्यकांत उजगरे, कमलाकर झोडगे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते देऊन उभयतांचा गौरव करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयाचे मुख्याध्यापक विजेंद्र चौधरी, क्रिडाध्यापक पंडित मेंडके, कार्यालय प्रमुख संतोष लवडकर, उपमुख्याध्यापक विठ्ठल काळे, कु प्राजक्ता वांगीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक अनंतराम कोपले सर यांनी आपल्या मनेगतातून रवींद्र वांगीकर यांचा सेवा भाव, प्रसन्न व्यक्तिमत्व व सेवेच्या शेवटच्या दिवसापर्यंत काम करण्याची इच्छा शक्ति ही वाखणण्या सारखी आहे. असे सांगितले व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.  या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोप करताना अमरनाथ खुर्पे यांनी सांगितले की, मितभाषी व कार्यकुशल कारकुणाच्या वर्तनाचा परिणाम कार्यलयात आलेल्या अभ्यागतावर होतो व तशी प्रतिक्रिया अभ्यागताकडून येते, आपल्या कर्तव्यावर निष्ठा व प्रेम असणारे प्रामाणिक लिपिक रवींद्र वांगीकर हे सेवा निवृत्त होत आहेत याची उणीव निश्चित भासेल. वांगीकर यांना आरोग्य पुर्ण दिर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाकर बनसोडे, आभार श्रीमती सुनंदा खांडेकर, सुत्रसंचालन श्रीकांत काळे यांनी केले, कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक राम जावळे, उध्दवराव नागरगोजे, रवींद्र वांगीकर यांचे आप्तेष्ट, मित्र, कुटुंबीय तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS