शिक्षण घेणं हा आता सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळणारा प्रकार झाला आहे काय? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. शिक्षण आता शासन संस्थेची जबाबदारी न

शिक्षण घेणं हा आता सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळणारा प्रकार झाला आहे काय? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. शिक्षण आता शासन संस्थेची जबाबदारी नसून खरेदी – विक्री प्रमाणे क्रयवस्तू झाली आहे. शिक्षण संस्था या नफा कमावणाऱ्या संस्था बनल्या आहेत. यापूर्वी शासनाचे अनुदान घेणाऱ्या संस्था आणि खाजगी शिक्षण संस्था यापैकी खाजगी शिक्षण संस्था विद्यार्थ्यांसाठी शुल्क आकारतात; परंतु, हे शिक्षण शुल्क वसुली करताना ते विद्यार्थी आणि पालक यांना शारीरिक इजा तर सोडाच, पण, मानसिक त्रास दिला तरी संस्था चालक कायद्याने गुन्हेगार बनतो. आता, शिक्षणाचे एवढे व्यासायिकिकरण झाले आहे की, एखादा संस्थाचालक पालकाचा जीव घेईल, याची कल्पनाही महाराष्ट्रात कुणी केली नसेल; पण, खालील घटनेने तर आख्खा महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचा तपशील
परभणीच्या उखळद गावातील पल्लवी जगन्नाथ हेंडगे या विद्यार्थिनीचा प्रवेश अवघ्या काही दिवसांपूर्वी पूर्णा तालुक्यातील हट्टा येथे असलेल्या हायटेक निवासी शाळेत तिचे वडील जगन्नाथ हेंडगे यांनी तिसरीत केला होता. मात्र तिथे काही दिवस राहिल्यानंतर मला इथे नको म्हणत गावातील शाळेतच टाका असा तगादा तीन वर्षीय मुलीने पालकांकडे लावला होता. त्यावरून तिचे वडील जगन्नाथ हेंडगे हे आपल्या मुलीची टीसी काढण्यासाठी हायटेक शाळेत गेले असता तिथेच त्यांचा घात झाला. संस्थाचालक असलेल्या प्रभाकर चव्हाण यांना हेंडगे यांनी प्रवेश घेताना दिलेले पैसे मागितले. यावेळी चव्हाण यांनीही हेंडगे यांना तुम्हीच उर्वरित फी द्या अशी मागणी केली .यातूनच वाद झाला अन् संस्थाचालक असलेल्या प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नीने जगन्नाथ हेंडगे यांना बेदम मारहाण केली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.जगन्नाथ हेंडगे यांना केवळ तीन एकर जमीन आहे.
या शेती करण्याबरोबरच ते वारकरी संप्रदायाचा झेंडा हाथी घेवून सर्वत्र कीर्तन प्रवचन करत होते. त्यामुळे त्यांना महाराजही बोलले जायचे. जगन्नाथ हेंडगे यांचा केवळ फिससाठी अशा पद्धतीने जीव घेण्यात आला आहे. यातील दोषी संस्थाचालकाला सरकारने सोडू नये, कठोर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी ही केलीय. शालेय फी वरून एखाद्या पालकाचा जीव घेण्याचा हा प्रकार हा जगातला अतिशय दुर्मिळ असा प्रकार आहे. या संदर्भात नव्या शैक्षणिक वातावरणामध्ये पालकांना चिंता लागली आहे. विद्यार्थ्यांची फी एकदाच भरून घेतल्यानंतर समजा त्या विद्यार्थ्याचं मन त्या शाळेत लागलं नाही आणि त्याला शाळा बदलायची आहे तरी यासाठी संस्था चालक संपूर्ण वर्षाची फी कशी आकारू शकता? त्यामुळे कोणत्याही पध्दतीने आणि बेकायदेशीर तंत्राने खाजगी शिक्षण संस्थांनी फी वसुलीचा हा कोणता प्रकार अवलंबला आहे? ते अतिशय भयावह आहे. महाराष्ट्राची शैक्षणिक दारूण अवस्था तर यामुळे दिसून येते. परंतु, सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या महाराष्ट्र किती मागास बनला याचेही हे निदर्शक आहे.

COMMENTS