भ्रष्टाचाराचा महारोग

Homeताज्या बातम्यासंपादकीय

भ्रष्टाचाराचा महारोग

धन्वन्तरी देवतेच्या रूपात पाहिल्या जाणाऱ्या राज्यातल्या सर्वच जिल्हा रुग्णालयाच्या बहुतांश सर्वच विभागात राक्षस संचारल्याचे वास्तव दिसत आहे. कोरोना क

वाचाळवीरांना लगाम हवा
विधानपरिषदेचा नवा अंक
समानतेच्या दिशेने…

धन्वन्तरी देवतेच्या रूपात पाहिल्या जाणाऱ्या राज्यातल्या सर्वच जिल्हा रुग्णालयाच्या बहुतांश सर्वच विभागात राक्षस संचारल्याचे वास्तव दिसत आहे. कोरोना काळात अवघ्या काही दिवसात राज्यातील हजारो डॉक्टर करोडपती झाले आहेत. दुसरे असे की, उपचार करणाऱ्यासह व्यवस्थापन, वितरण आणि प्रशासकीय अधिकाराच्या कार्यकर्तृत्वातच जर भ्रस्टाचार संचारला असेल तर हि विषारी आरोग्य यंत्रणा समाजासाठी किती भयंकर घातक असेल याचा अंदाज बांधणे आवाक्याबाहेरचेच आहे. भारतीय लोकशाहीत अधिकाराचा गैरवापर, बेकायदेशीर कामे, कामात उदासीनपणा,  किंबहुना: कायदेशीर मार्गाचा उपयोग, पळवाटा काढून कुठल्याही भ्रष्टचारासाठी यंत्रणा बेकायदेशीररीत्या गैरकृत्य करत असेल तर अश्याना आपल्या न्यायव्यवस्थेत शासन होते. सत्ता, संपत्ती, सामाजिक दर्जा असणाऱ्या बड्या दिग्गज वैद्यकीय अधिकारी, पदाधिकारी यांच्यासह इतरांना  बेकायदेशीर मार्गाने गिळलेले उलटी करावं लागलं हे सर्वानी पाहिलेले आहे.
 नियमाला लकवा मारून, बेकायदेशीर मार्गाने कृत्य करणारे अनेक प्रकार राज्यातील खाजगी आणि सर्व जिल्हा रुग्णालयात घडत आहेत. रुग्णालयात इमाने इतबारे कामे करणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी अनेक आहेत. ते तत्परतेने रुग्णसेवा करतात हेही खरे. त्यांचे अभिनंदन करणे क्रमप्राप्तच.  पण या रुग्णालयात सुळसुळाट माजलेला दिसतो तो भ्रष्टचारी अधिकाऱ्यांचाच. याला लगाम कोण घालणार?  हा प्रश्न तसा गंभीरच. कारण, या आरोग्य विभागाचे अनेक चालक योग्य मार्गाने कर्तव्य निभावत वाटचाल करत असले तरी या विभागाच्या जबाबदारांकडे त्यांचा लगाम असल्यामुळे हा आरोग्याचा गाडा बेभानपणे सुटलाय, तो भ्रष्टचाराच्या वाटेने. यात चिरडले जाताहेत ते सामान्य रुग्ण. जबाबदार जर ‘मुन्नाभाई एम. बी. बी. एस’ चित्रपटातील डॉक्टरसारखे  मामू बनवत असतील तर त्याच्यावर विलाज करण्याची व्यवस्था आपल्या संसदीय लोकशाहीत आहे. कोविड – १९ च्या जागतिक महामारीत महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्हा रुग्णालयासह इतर सरकारी आणि खाजगी रुग्णालयात अनेक कर्मचारी, अधिकारी यांनी जिवाची बाजू लावून रुग्णसेवा केली असतांना अनेक वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी अमाफ पैसे कमवले हे सर्वसृत. अशा डॉक्टरांमुळे हे क्षेत्र डागाळले आहे हे खरेच पण, राज्यातल्या आरोग्य विभागाचा आजवरचा इतिहास पारदर्शक राहिला आहे. मागील काही महिन्यापासून या पारदर्शकतेला कलंक लागल्याचे चित्र दिसत आहे. या विभागात काही अधिकारी, कर्मचारी गुळाच्या ढेपेला मुंगळे लागल्याप्रमाणे जिल्ह्यात चिटकून आहेत. काहींचा पराक्रम असा देखील आहे की, नौकरी लागल्यापासून निवृत्तीच्या मध्यांत किंबहुना: निवृत्तीच्या उंबरठ्यापर्यंत अनेकजण एकाच ठिकाणी तळ ठोकून आहेत. अश्या महाशयांना बदलीचा नियम लागू नाही का? असा संतप्त सवाल देखील आहे. बदल्या कशा रोखायच्या आणि कशा करायच्या हे तसे त्या सर्वानांच ठाऊक. बदली रोखणे किंवा जिल्ह्यातच मुंगळ्यासारखे चिटकून रहाणे यावर आक्षेप नसला तरी कामात भ्रष्टचार करणे यावर आक्षेप असणे चुकीचे नाही. राज्यातील विविध रुग्णालयात  सुरु असलेल्या भ्रष्टचाराची, उदासीनतेची, बिघडलेल्या यंत्रणेची, डॉक्टर, कर्मचारी यांना लागण झालेल्या बेशिस्तीची, रुग्णालयात होणाऱ्या आर्थिक, मानसिक पिळवणुकीची आणि हा आजार जडलेल्या कर्मचारी, अधिकारी महारोग्यांची हि परंपरा केव्हा बंद होणार हाच खरा प्रश्न आहे. आरोग्य क्षेत्राला जडलेला भ्रस्टाचाराचा महारोग लवकर बारा व्हावा हि अपेक्षा. 

COMMENTS