बालिकेचे अपहरण करणारा पाठलाग करून पकडला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बालिकेचे अपहरण करणारा पाठलाग करून पकडला

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर तालुक्यातील मेहेकरी येथील तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण करणारा आरोपी ग्रामस्थांच्या मदतीने पकडण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी

पंतप्रधान मोदींना पाठवल्या नगरमधून शेणाच्या गोवर्‍या
गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घ्यावी ना. आशुतोष काळे
शेतकऱ्यांना अर्थसहाय्यापेक्षा आधाराची गरज

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर तालुक्यातील मेहेकरी येथील तीन वर्षाच्या मुलीचे अपहरण करणारा आरोपी ग्रामस्थांच्या मदतीने पकडण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी सागर आनंदा सुरे (वय 23, गाव-पिशोरा, ता कन्नड, जि.औरंगाबाद) याच्यावर अपहरण आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोस्को) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नगर तालुका पोलिस ठाण्याचे रणजीत मारग करीत आहेत. नगर तालुक्यातील मेहेकरी येथील तीन वर्षेच्या मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली. नगर तालुका पोलिसांनी व गावातील युवकांनी आणि ग्रामस्थांनी अपहरण करणार्‍याची शोध मोहीम राबवून आरोपी सागर आनंदा सुरे याच्या तावडीतून मुलीस सोडवून सागर सुरे याला अटक केली आहे. ही कारवाई नगर-पाथर्डी रोडवरील मेहेकरी ते कौडगाव जाणार्‍या रोडवर केली.
नगर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील मेहेकरी येथे गरीब कुटुंबातील ही तीन वर्षाची मुलगी आहे. सागर सुरे याने नगर-पाथर्डी रोडवरील एका किराणा दुकानाशेजारी राहत असलेल्या वस्तीवरील या तीन वर्षाच्या मुलीला मोटारसायकलवर बसवून तो पाथर्डीच्या दिशेने निघाला होता. ही घटना किराणा दुकानदार यांनी पाहिली. हा अनोळखी व्यक्ती असल्याने त्यांनी तत्काळ घरासमोर धुणे धूत असलेल्या मुलीच्या आईला ही घटना सांगितली. मुलीच्या आईने तिच्या सासूला हे सांगितले व सासूने आपल्या मुलाला तात्काळ फोन करून याची माहिती दिली. मुलीच्या वडिलांनी पोलिसांनाही ही माहिती दिल्यानंतर नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकातील पोलिस पथक व गावकर्‍यांनी अपहरण केलेल्या मुलीचा शोध सुरू केला. अपहरणकर्ता मुलीला घेऊन ज्या रस्त्याने गेला, त्या रस्त्यावर शोध सुरू केला. त्यानंतर त्यांनी या मुलीस नगर-पाथर्डी रोडवर मेहेकरी-कौडगाव दरम्यान आरोपीच्या कब्जामधून सोडविले व नगर तालुका पोलिसाच्या पथकांनी मुलीला पालकांच्या ताब्यात दिले. ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक सानप यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक मारग, पोलिस नाईक अजहर सय्यद, पोलिस नाईक सचिन वनवे, पोलिस कॉन्स्टेबल विशाल टकले आदीच्या पथकाने केली आहे.

शुद्धीत केले अपहरण
सुरे याने दारूच्या नशेमध्ये मुलीचे अपहरण केल्याची घटना केल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला होता. त्यामुळे नगर तालुका पोलिसांनी त्याची मेडिकल केली. त्यामध्ये तो दारू प्यायलेला नाही, असा रिपोर्ट आला. त्यानंतर सागर आनंदा सुरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला व या प्रकरणाचा पुढील तपास नगर तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रणजीत मारग करीत आहेत.

COMMENTS