Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्तव्यावरील खाकी वर्दीने घडविले माणुसकीचे दर्शन !

प्रसववेदना होणार्‍या महिलेला पोहोचविले रुग्णालयात

लातूर प्रतिनिधी - रात्रीचा काळोख... पहाटेचे 1:45 वाजलेले... राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, जवान गस्तीवर असताना एका हॉटेलवर चहा घेत होते. द

मविआला लाडक्या बहिणींचा त्रास
देवेंद्र फडणवीस यांनी घेतली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
चिपळूण येथील सुभेदार अजय ढगळे शहीद

लातूर प्रतिनिधी – रात्रीचा काळोख… पहाटेचे 1:45 वाजलेले… राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, जवान गस्तीवर असताना एका हॉटेलवर चहा घेत होते. दरम्यान, दोन महिला एका ऑटो चालकाला काकुळतीने विनवणी करीत होत्या… दादा ऐका ना हो… आमची बाई बाळंतपणासाठी तडफडत आहे. आम्हाला दवाखान्यात सोडा ना…यावर ऑटोचालकाने कुठलीही दाद न देता तो सुसाट गेला. हा सगळा प्रसंग गस्तीवर असलेले निरीक्षक आर.एम. चाटे, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गोले आणि जवान संतोष केंद्रे यांच्या नजरेला पडला. त्यांनी तातडीने वेळ आणि प्रसंग ओळखला… हातातला चहाचा ग्लास झटक्यात खाली ठेवला अन् ते त्या महिलांकडे गेले.

विचारपूस केली असता, त्या महिलांनी सांगितले, ‘आमच्या घरात एक महिला गरोदर आहे. तिला प्रसववेदना होत आहेत. तिला लगेच दवाखान्यात न्यावे लागणार आहे साहेब… काय करावं एकबी गाडी, ऑटो थांबत नाही बघा…’ यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आर.एम. चाटे आणि गणेश गोले यांनी तातडीने आपले वाहन त्या महिलेच्या घरासमोर उभे केले. महिलेला वाहनात घेत ते जांब-जळकोटच्या दिशेने निघाले. प्रसववेदनेने विव्हळत असलेल्या महिलेची प्रसूती वाटेतच झाली आणि तिला पुत्ररत्न झाले. त्यांनी बाळंत महिलेला जांब (ता. मुखेड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉ. माया कापसे यांनी तातडीने बाळंत महिला आणि बाळावर उपचार केले. बाळ आणि बाळंत महिलेची तब्येत उत्तम आहे. वेळेवर महिलेला दवाखान्यात दाखल करण्यात आल्याने उपचारही करता आले, असे डॉ. कापसे म्हणाल्या. रात्रीच्या काळोखात कर्तव्यावर असलेल्या खाकी वर्दीने माणुसकीचे दर्शन घडविल्याने महिलेची प्रसूती सुखरूप झाली. याबद्दल लातूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राऊत यांनी त्यांचा सत्कार केला

COMMENTS