Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘द केरळ स्टोरी’फेम अभिनेत्री अदा शर्माचा अपघात

'द केरळ स्टोरी' या सिनेमामुळे अभिनेत्री अदा शर्मा चर्चेत आली. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. दरम्यान अभिनेत्रीचा अपघात झाला आहे. सो

राज्यात 17 ते 31 सप्टेंबर दरम्यान ‘आयुष्मान भव’ मोहीम
निम्मे पदवीधर भारतात बेरोजगार! 
मशिदी वरील भोंग्यांचा त्रास आम्ही उदाहरणासह समोर आणला l LOK News 24

‘द केरळ स्टोरी’ या सिनेमामुळे अभिनेत्री अदा शर्मा चर्चेत आली. या सिनेमातील तिच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. दरम्यान अभिनेत्रीचा अपघात झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाका करत असताना या सिनेमाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन आणि अभिनेत्री अदा शर्मा 14 मे रोजी एका हिंदू यात्रेता सहभागी होण्यासाठी करीमनगरला जात होते. दरम्यान त्यांचा अपघात झाला. अदा शर्माने दिली हेल्थ अपडेट अदा शर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना हेल्थ अपडेट दिली आहे. तिने ट्वीट करत लिहिलं आहे,”मित्रांनो मी ठीक आहे. आमच्या अपघातासंदर्भात अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण माझ्यासह आमच्या टीममधील सर्व मंडळी ठीक आहेत. कोणाला गंभीर दुखापत झालेली नाही. माझ्याबद्दल काळजी व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद”.

COMMENTS