Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाणे ते बोरिवली प्रवास होणार आता 20 मिनिटांत

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या गर्भातून होणार दोन बोगदे

मुंबई :  ठाणे ते बोरिवली 23 किलोमीटरचे अंतर आता 20 मिनिटांत पार करता येणार आहे.  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या गर्भातून दोन भूमिगत बोगद्यास रा

ठाकरे गटाला मोठा धक्का, नीलम गोऱ्हेंचा मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
महसुल सप्ताहानिमित्त अंबाजोगाई तहसील कार्यालयात माजी सैनिकांशी संवाद
बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करताना पकडले रंगेहाथ

मुंबई :  ठाणे ते बोरिवली 23 किलोमीटरचे अंतर आता 20 मिनिटांत पार करता येणार आहे.  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या गर्भातून दोन भूमिगत बोगद्यास राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने मान्यता देण्यात आल्याची माहिती एमएमआरडीए अध्यक्ष संजय मुखर्जी यांनी दिली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर वाहन चालकांचा दीड तास वाचेल तसेच कार्बन उत्सर्जन कमी होऊन प्रदूषण देखील कमी होण्यास मदत होईल.

मुंबई जिल्ह्याच्या पश्‍चिम उपनगरातील बोरीवली आणि ठाणे  जिल्ह्याला भूमिगत मार्गाने जोडणार्‍या सदर प्रकल्पाच्या व्याप्तीमध्ये 10.25 किमीचा बोगदा आणि 1.55 किमीचा पोहचमार्ग असा 13.05 मीटर अंतर्गत व्यासासह सुमारे 12 किमी लांबीचा दुहेरी भूमिगत बोगदा असणार आहे. या बोगद्याच्या दोन्ही बाजूस 2+2 मार्गिकांसह आपत्कालीन मार्ग देखील असणार आहे. प्रत्येक 300 मीटरवर पादचारी क्रॉस पॅसेज आणि प्रत्येक दोन पादचारी क्रॉस पॅसेजनंतर वाहन क्रॉस पॅसेजची तरतूद आहे. प्रकल्पातील बोगद्यांचे बांधकाम हे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आणि चार टनल बोरिंग मशिनच्या मदतीने करण्यात येणार आहे. सुमारे 12 किमी लांबीच्या प्रकल्पातील 4.43  किमी लांबीचा ही ठाणे जिल्ह्यातून तर 7.4 किमी लांबी ही बोरीवलीमधून प्रस्तावित आहे. प्रकल्पातील या बोगद्यांमध्ये अग्निशामक यंत्रे, पाण्याची नाळी, स्मोक डिटेक्टर, एलईडी लाईटचे संकेत फलक लावले जातील. बोगद्यात नैसर्गिक किंवा यांत्रिक मार्गाने पुरेशी वायुविजन प्रणाली देखील उभारली जाणार आहे. प्रकल्पाची किंमत ही सुमारे रुपये 16600 कोटी इतकी असून त्यामध्ये जमीन अधिग्रहणाच्या खर्चाचा ही समावेश आहे. एकूण 46.57 हेक्टर जमीन अधिग्रहित करावी लागणार आहे, त्यात 35.53 हेक्टर सरकारी वन्य जमीन आहेत, तर उर्वरित जमीन चितळसर, मानपाडा, माजिवडा, मागाठाणे, बोरीवडे, चेने आणि येऊर या गावात आहेत. अंधेरी येथील गोपालकृष्ण गोखले पुलाचे मागील अनेक महिन्यांपासून काम सुरु आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं काम सुरु होतं. नोव्हेंबर 2022 पासून गोखले पूल हा वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता.जून महिन्याच्या अखेरीस गोखले पुलाच्या दोन मार्गिका सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून मुंबई महापालिका प्रयत्नशील होती. पुलाच्या बांधकामासाठी विशेष करून स्टील गर्डरसाठी वापरण्यात येणार्‍या स्टीलचा पुरवठा प्रभावित झाल्याने कामात विलंब झाला असल्याचा मुंबई महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

COMMENTS