Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शाईफेक प्रकरणातील त्या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराची अखेर सुटका

मुंबई/प्रतिनिधी ः राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये शाईफेक केल्यानंतर त्यासंबंधींचा व्हिडिओ माध्यमा

रावेतऐवजी शिवणेतील बंधार्‍यातून पाणी घ्या
19 हजार महिला बेपत्ता असतांना गप्प बसायचे का ?
धनगर आरक्षणाकडे सर्वाचेच दूर्लक्ष : बाळासाहेब दोडतले

मुंबई/प्रतिनिधी ः राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये शाईफेक केल्यानंतर त्यासंबंधींचा व्हिडिओ माध्यमांना देणार्‍या पत्रकारांवर तोंडसुख घेतले होते. या पत्रकारांने योग्य तो अँगेल कसा घेऊन, शाईफेकण्याचा व्हिडिओ प्रसारित केला, यावरुन टीका केली होती. पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणात एका वृत्तवाहिनीचे पत्रकार गोविंद वाकडे यांना या प्रकरणात ताब्यात घेतले होते. मात्र पत्रकार संघटनांच्या तीव्र प्रतिक्रियेनंतर रविवारी रात्री उशिरा त्यांना सोडण्यात आले.


चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणार्‍या आरोपींच्या संपर्कात गोविंद वाकडे आधीपासून होते, असा आरोप पोलिसांनी केला आहे. त्यानंतर गोविंद वाकडेंवर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या अटकेची बातमी समजताच राज्यभरातील पत्रकार संघटना आक्रमक झाल्या होत्या. पत्रकार संघटनांच्या मागणीनंतर पोलिसांनी वाकडे यांची सुटका केली.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेनंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पाटील जिथे जिथे जातील, तिथे तिथे स्थानिक पोलीस ठाण्याच्या पोलिसांबरोबर गुन्हे शाखेचे पाच पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. पाटील यांची गाडी ज्या रस्त्यावरून जाणार असतील, त्या रस्त्यावर वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात येईल. राज्य पोलिसांच्या या सुरक्षेबरोबरच सीआयएसएफ या केंद्रीय सुरक्षा दलाची देखील सुरक्षा आहे. त्यामध्ये देखील वाढ करण्याचा विचार सुरू आहे. पाटील यांच्या पुण्यातील कर्वेनगर भागातील एका संस्थेच्या भेटीवेळी वारजे पोलीस ठाण्याचे 50 पोलीस, गुन्हे शाखेचे पाच अधिकारी, वाहतूक पोलिसांचे कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केले होते. दरम्यान चोख बंदोबस्त असतानाही शनिवारी चिंचवड येथे पाटील यांच्यावर मनोज गरबडे आणि त्याच्या दोन साथीदारांनी शाई फेकली. त्यानंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कारवाई करत आठ पोलीस कर्मचारी आणि तीन अधिकारी अशा एकूण 11 जणांना निलंबित केले.


शाई फेकणार्‍यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी – पाटील यांच्या चेहर्‍यावर शाई फेकल्यानंतर पोलिसांनी मनोज गरबडे (समता सैनिक दल संघटक), धनंजय इचगज (समता सैनिक दल सदस्य) आणि वंचित बहुजन आघाडीचे सचिव विजय ओव्हाळ या तिघांना ताब्यात घेतले. त्या तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मनोज गरबडेने पाटील यांच्या तोंडावर शाई फेकली आणि तिथे घोषणाबाजी देखील केली. त्यानंतर पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या तिघांवरही विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

COMMENTS