शिरुर प्रतिनिधी - न्यजीव संरक्षण संवर्धन क्षेत्रामध्ये राष्ट्राच्या उभारणीत एक मूलभूत घटक असलेला प्रकल्प सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र (तागडगाव.
शिरुर प्रतिनिधी – न्यजीव संरक्षण संवर्धन क्षेत्रामध्ये राष्ट्राच्या उभारणीत एक मूलभूत घटक असलेला प्रकल्प सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र (तागडगाव. तालुका शिरूर कासार .जिल्हा बीड ) गेल्या दोन तपापासून उजाड माळरानावर गाव कुसाबाहेर, मानव वस्ती कोसोदूर , जखमी ,आजारी व मातृत्वापासून दुरावलेल्या वन्यजीवांची सेवा सुश्रुषा करत आहे. या प्रकल्पात महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून वन्यजीव उपचारासाठी येत असतात. शिवाय देश विदेशातून भेटीसाठी पर्यटक निसर्गप्रेमी ,वन्यजीव प्रेमी मोठ्या प्रमाणात भेट देण्यासाठी येत राहतात. या प्रकल्पाकडे जाण्या-येण्याकरिता शेकडो वर्षांपूर्वीचा वहिवाटीचा जांब पाडळी शिवरस्ता जांब येथील शेतकरी राजाराम पिंपळे व इतर (गट नंबर 222) शेतकर्याने जेसीबीच्या साह्याने खोदून बांध टाकून अडवला आहे .या अडवलेल्या रस्त्यामुळे सर्पराज्ञीकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे जखमी, आजारी व मातृत्वापासून दुरावलेल्या वन्यजीवांना उपचारासाठी ने-आन करण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. वन्यजीवांना सर्पराज्ञीत उपचारासाठी ने- आण करण्यासाठी प्रकल्प संचालक सिद्धार्थ सोनवणे व सृष्टी सोनवणे यांना उन्हातानात, रात्री अपरात्री दररोज मोठी कसरत करत पायपीट करावी लागत आहे .याबाबत दिनांक 31 रोजी तहसीलदार शिरूर कासार यांच्याकडे देखील रस्ता खुला करून मिळणे बाबतचा लेखी अर्ज दिलेला आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांना देखील दि. 12 रोजी सदरील रस्ता खुला करून मिळणे बाबतचा अर्ज दिलेला आहे. मात्र या अर्जावर अद्याप पर्यंत कसलीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे निसर्गप्रेमींमध्ये कमालीचा संताप निर्माण झाला आहे आहे.
शेकडो वर्षांपूर्वीचा सर्पराज्ञीकडे जाणारा वहिवाटीचा जांब- पाडळी शिवरस्ता जिल्हाधिकारी दीपाताई मुधोळ -मुंडे यांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करत खुला करून द्यावा .जेणेकरून सर्पराज्ञीतील वन्यजीवांना दररोज लागणारे अन्न- औषधोपचार करणे सुरळीत होईल. आज मीतिला आम्हाला दररोज दिड किलोमीटर पासून पायी प्रवास करावा लागत आहे .शिवाय उन्हात, रात्री अपरात्री एखादा जखमी आजारी किंवा मातृत्वापासून दुरवलेल्या वन्यजीवांना उपचारासाठी खांद्यावर घेऊन पायपीट करत सर्पराज्ञीत आणावे लागत आहे.तसेच जखमी आजारी किंवा मातृत्वापासून दुरवलेल्या वन्यजीवांना पर्यंत आम्ही वेळेत पोहोचू न शकल्याने त्यांचे प्राण जात आहेत. सात दिवसापूर्वीच एका जखमी पाडसास रात्री साडेतीन वाजता रस्त्यामुळे वेळेत न पोहोचल्यामुळे त्याचा जागेवरच तडफडून मृत्यू झाला .
-सृष्टी सोनवणे, संचालिका :सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र
सर्पराज्ञीकडे जाणारा जाब-
पाडळी शिवरस्ता शेतकर्याने खोदून आडवा बांध टाकून बंद केल्याने सर्पराज्ञीत उपचारासाठी भर उन्हात खांद्यावर घेऊन पायपीटन करत निष्पाप जखमी काळविटाचे प्राण वाचवण्यासाठी सर्पराज्ञीत उपचारासाठी घेऊन जाताना सर्पराज्ञीचे संचालक सिद्धार्थ सोनवणे.
COMMENTS