Homeताज्या बातम्याक्रीडा

भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ ने विजय मिळवला.

भारत आणि न्यूझीलंड संघात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने श

चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू तुषार देशपांडेचा झाला साखरपुडा
एनसीसीमध्ये मुलींनी प्रवेश घेतल्यास करीयर घडविता येते : कु. आयुषी भांड
विराट -अनुष्का दुसऱ्यांदा होणार आईबाबा होणार?

भारत आणि न्यूझीलंड संघात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने शुबमन गिलच्या शतकी खेळीच्या जोरावर ऐतिहासिक विजय मिळवला. त्याचबरोबर १२.१ षटकांत ६६ धावांवर न्यूझीलंडचा डाव गुंडाळताना १६८ धावांनी विजयाची नोंद केली. शुबमनने शतकी खेळी करताना विराट रोहित आणि रैनासारख्या खेळाडूंना मागे सोडताना अनेक विक्रमांना गवसणी घातली.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी शतक झळकावणारा शुबमन सर्वात तरुण फलंदाज ठरला. त्याचबरोबर गिल तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण खेळाडूदेखील ठरला. शुबमन गिलने ६३ चेंडूचा सामना करताना १२६ धावांची नाबाद खेळी केली. ज्यामध्ये त्याने १२ चौकार आणि ७ षटकार लगावले. त्याचबरोबर भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ ने विजय मिळवला.

COMMENTS