Homeताज्या बातम्यादेश

राजधानीत होणारी इंडिया आघाडीची बैठक रद्द

नवी दिल्ली ः पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकाल हाती आल्यानंतर तेलगंणाचा अपवाद वगळता इतर राज्यात काँगे्रसचे पानीपत झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर

पुणे शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये पुन्हा ऑक्सिजनचा तुटवडा
सिद्धरामय्याभोवती ईडीचा फास !
समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली ः पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकाल हाती आल्यानंतर तेलगंणाचा अपवाद वगळता इतर राज्यात काँगे्रसचे पानीपत झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर राजधानी दिल्लीत 6 डिसेंबर रोजी इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती, मात्र तडकाफडकी ही बैठक रद्द करण्यात आली आहे.
तीन मोठ्या नेत्यांनी बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. पुढील बैठक 18 डिसेंबर रोजी होणार असल्याचे कळते. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये केंद्रातील सत्ताधारी भाजपला प्रचंड यश मिळाले आहे. भाजपला आव्हान देण्यासाठी एकत्र आलेल्या इंडिया आघाडीला यामुळे धक्का बसला आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या वेळी इंडिया आघाडीतील काही पक्षांमध्ये जागावाटपावरून मतभेद झाले होते. त्यामुळे काँग्रेससह समाजवादी पक्ष व नितीश कुमारांचा संयुक्त जनता दल हे पक्ष स्वतंत्र लढले होते. निकाल येताच या नेत्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. विधानसभा निवडणुकांच्या काळात काँग्रेसने इंडिया आघाडीची बैठक घेण्यास टाळाटाळ केली होती. निकालानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बैठक बोलावली होती. मात्र, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमांचे कारण देत बैठकीला येण्यास नकार दिला. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही या बैठकीपासून दूर राहणे पसंत केल्याचे बोलले जात आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही बैठकीला येण्यास नकार दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ही बैठकच रद्द करण्याची नामुष्की काँग्रेसवर ओढवली आहे.  

COMMENTS