काही वर्षांपूर्वी राजधानी दिल्लीतील वाढते प्रदूषण चिंतेचा विषय होता. मात्र आता राजधानीला मागे टाकत मुंबईने जगात दुसरा क्रमांक पटकावला, यावरून मुं
काही वर्षांपूर्वी राजधानी दिल्लीतील वाढते प्रदूषण चिंतेचा विषय होता. मात्र आता राजधानीला मागे टाकत मुंबईने जगात दुसरा क्रमांक पटकावला, यावरून मुंबईतील वाढत्या प्रदूषणाची धोक्याची कल्पना समोर येते. मुंबईसारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या शहराला प्रदूषणाचा विळखा घट्ट होतांना दिसून येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर प्रदूषणाचा विळखा सोडवण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्सनुसार, 29 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान मुंबई हे जगातील दुसरे सर्वात प्रदूषित शहर होते. 29 जानेवारी 2023 रोजी सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई दहाव्या स्थानावर होती. मात्र एका आठवडयात सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत मुंबई दुसर्या स्थानावर पोहोचली आहे. 13 फेब्रुवारी रोजी प्रदूषणाबाबत मुंबईने भारतातील सर्वात प्रदूषित शहर असलेल्या दिल्लीलाही मागे टाकले. आता, दिल्ली हवेच्या गुणवत्तेसाठी जगातील तिसरे सर्वात प्रदूषित शहर बनले आहे. प्रदूषण ही आजच्या काळातील एक खूप गंभीर समस्या बनली आहे. वाढती लोकसंख्या, वृक्षतोड, औद्योगिक कचरा, नैसर्गिक साधनसंपत्तीचा गैरवापर अश्या अनेक कारणामुळे प्रदूषण भयंकर वाढत आहे. प्रदूषण ही समस्या आता फक्त भारता पूर्ती मर्यादित नसून जग भरात देखील ही समस्या खूप वाढत आहे. प्रदूषणाचा प्रभाव हा फक्त मनुष्यावरच नाही तर सर्वच सजीवांवर होतो. प्रदूषण ही समस्या दिवेसंदिवस वाढतच आहे, औद्योगिक कचरा थेट मातीत, पाण्यामध्ये आणि हवेत मिसळत आहे. एवढे असूनही लोक प्रदूषणाला आणि त्याच्या परिणामाला गांभीर्याने घेत नाही आहेत. या गोष्टींकडे आता अजून दुर्लक्ष केले तर आपल्या भावी पिढयांना याचा खूप त्रास होऊ शकतो. वाढते प्रदूषण म्हणजे जीवन नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक वातावरण, जल आणि भूप्रदेशात मिसळणे. हवेमध्ये डीझेल या इंधनातून सल्फर असलेला धूर वातावरणात मिसळतो. यामुळे वातावरणात अतिउच्च असलेल्या ओझोन वायूच्या थराला हानी पोहचून सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे पृथ्वीवर नको असतांना पोहचतात. यामुळे पर्यावरणाचा र्हास होतो आणि जीवनचक्र ढासळते. परिणामतः जागतिक तापमानवाढ, उष्माघात, त्वचेचा कर्करोग या सारखे धोके निर्माण होतात. मुंबईतील वाढते हवा प्रदूषण सध्या चिंतेचा विषय बनला आहे. मुंबईत दिवसेंदिवस प्रदूषण वाढत असून नुकताच एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण या चारही औद्योगिक क्षेत्रात जानेवारी महिन्यातील 31 पैकी 31 दिवस म्हणजेच, संपूर्ण महिना प्रदूषीत आढळल्याची माहिती समोर आली आहे. ग्रीन प्लॅनेट सोसायटीच्या सुरेश चोपणे यांनी अहवाल दिला आहे. प्रदूषण ही समस्या दिवेसंदिवस वाढतच आहे. औद्योगिक कचरा थेट मातीत, पाण्यामध्ये आणि हवेत मिसळत आहे. एवढे असूनही लोक प्रदूषणाला आणि त्याच्या परिणामाला गांभीर्याने घेत नाही आहेत. या गोष्टींन कडे आता अजून दुर्लक्ष केले तर आपल्या भावी पिढयांना याचा खूप त्रास होऊ शकतो. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण या चारही औद्योगिक क्षेत्रात महिन्याचे 31 दिवस प्रदूषित आढळल्याचे अहवालातून समोर आले आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हवा गुणवत्ता निर्देशांकाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. मुंबईतील प्रदूषणास धूलीकण, वाहनांची वाढती संख्या, बांधकाम, ज्वलन कचरा कारणीभूत आहे. सोबतच मुंबईची भौगोलिक परिस्थिती, वार्याची संथ गती आणि हिवाळ्यातील कमी तापमान देखील कारणीभूत आहे. नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याची कडक अंमलबजावणी करण्याची गरज आहे. तसेच दिल्लीप्रमाणे अनेक अन्य उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.
COMMENTS