मेढा / प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून एसटी महामंडळाच्या मेढा आगाराला नवीन 8 एस
![](https://lokmanthan.com/wp-content/uploads/2025/02/16-3-1-650x438.jpg)
मेढा / प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून एसटी महामंडळाच्या मेढा आगाराला नवीन 8 एसटी बसेस मिळाल्या आहेत. या एसटी बसेसचा लोकार्पण सोहळा नुकताच मेढा आगारात उत्साहात झाला. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एसटी बसमधून प्रवासाचा आनंद लुटला.
याप्रसंगी जावलीचे तहसीलदार हणमंत कोळेकर, गटविकास अधिकारी निलेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सातारा विभाग नियंत्रक रोहन पलंगे, ज्योती गायकवाड, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सुरेंद्र भूतकर, शाखा अभियंता सुरेश कुंभार, मेढा आगार व्यवस्थापक नीता बाबर, आगारातील अधिकारी, वाहक, चालक व तालुक्यातील नागरिक आदी उपस्थीत होते.
मेढा आगारातील अनेक बसेस जुन्या झाल्या होत्या. त्यामुळे एसटी बसेस बंद होण्याचे प्रकार नेहमी घडत होते. यासाठी तालुक्यातील नागरिकांनी नवीन एसटी बसेस मिळण्याची मागणी वारंवार मेढा आगारकडे तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे केली होती. नागरिकांना सुखकर प्रवास करता यावा यासाठी ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वतः करत राज्य परिवहन विभागाकडे नवीन बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीला यश मिळाले असून राज्य परिवहन विभागाकडून मेढा आगाराला नवीन आठ बसेस मिळाल्या आहेत.
COMMENTS