Homeताज्या बातम्यादेश

नोकरी सोडत नसल्यानं पतीने पत्नीला केली अमानुष मारहाण

याप्रकरणी पतीला पोलिसांनी अटक केली

केरळ प्रतिनिधी - वारंवार सांगूनदेखील नोकरी सोडत नसल्यानं पत्नीला अमानुष मारहाण करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. केरळमधील मलयंकिझू येथे ही

धोंडीपुरा शाळेची जुनी इमारत पाडण्यास सुरुवात
जातनिहाय जनगणना अपरिहार्य? सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे पडसाद
सुनील पवार यांची रायगड जिल्हा पोलीस निवडी बद्दल सत्कार

केरळ प्रतिनिधी – वारंवार सांगूनदेखील नोकरी सोडत नसल्यानं पत्नीला अमानुष मारहाण करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. केरळमधील मलयंकिझू येथे ही घटना घडली. संबंधित व्यक्ती पीडित महिलेला मारहाण करीत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्याला खूनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केली. माशेल येथील रहिवासी असणारा 27 वर्षीय दिलीप याची 24 वर्षांची पत्नी सुपरमार्केटमध्ये नोकरी करत होती. स्वतःची पत्नी नोकरी करत असल्याचं दिलीपला आवडत नव्हतं. तो वारंवार तिला नोकरी सोडण्यास सांगत होता. मात्र, तिनं नोकरी सोडण्यास नकार दिला, व ती त्याच्या इच्छेविरुद्ध सुपरमार्केटमध्ये काम करण्यासाठी जात होती. याचा राग आल्यानं दिलीपनं दारूच्या नशेत त्याच्या पत्नीला अमानुष मारहाण केली, यात तिच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली, व चेहरा रक्तबंबाळ झाला. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दिलीपला अटक केली.

COMMENTS